महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा युवा पुरस्काराने इंजि. नितीन धांडे सन्मानित
गुरुवार, 21 अगस्त 2025
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :– युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान, तुमसर चे संस्थापक अध्यक्ष इंजि. नितीन रामरतनजी धांडे यांना यंदाचा 2024-25 जिल्हा युवा पुरस्कार जाहीर झाला असून नुकत्याच झालेल्या 15 ऑगस्ट स्वतंत्रता दिना निमित्ताने जिल्हा प्रशासन द्वारे आयोजित कार्यक्रमात त्यांना सन्मानित करण्यात आले.
सामाजिक कार्य, शिक्षण, आरोग्य, गडसंवर्धन, महिला सक्षमीकरण, व्यसनमुक्ती, युवकांना मार्गदर्शन, पर्यावरण, क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रातील पुढाकार तसेच विविध उपक्रमांमधील सक्रिय सहभाग या कार्याचा गौरव म्हणून भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री संजयजी सावकारे यांच्या हस्ते तर खासदार श्री. प्रशांतजी पडोळे, विधान परिषद आमदार डॉ. परिणयजी फुके, जिल्हाधिकारी सावन कुमार, पोलिस अधिक्षक नुरुल हसन, जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाळे यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर नितीन धांडे यांनी, “हा सन्मान माझ्या कार्याला मिळालेली साद असून अजून नवस्फूर्तीने काम करण्याकरिता प्रेरणा देणारे आहे. या यशाबद्दल, प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजमाता जिजाऊ माँ साहेब, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व सर्व महापुरुषांना हा पुरस्कार समर्पित करतो तसेच आधारस्तंभ वडील श्री रामरतन मोतीराम धांडे, आई रुखमाबाई रामरतन धांडे, रात्रंदिवस सुखात दुःखात खंबीरपणे साथ देणाऱ्या छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान ची संपूर्ण चमू तसेच सर्व शाखांच्या सदस्यांचा, पत्रकार बांधव, प्रशासकीय अधिकारी कर्मचारी वर्ग व सर्व जनतेचे विश्वास यांचे ह्या पुरस्कारा बद्दल आभार मानतो त्यांच्या साथीने हा पुरस्कार प्राप्त झाला तसेच यापुढेही समाजकार्यात निःस्वार्थपणे सक्रिय राहून समाज हित सातत्याने जपण्याचा सदोदित यत्न करित राहीन,” अशी भावना व्यक्त केली.
0 Response to "महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा युवा पुरस्काराने इंजि. नितीन धांडे सन्मानित"
एक टिप्पणी भेजें