-->

Happy Diwali

Happy Diwali
रोटरी क्लब भंडाराचा पदग्रहण सोहळा संपन्न.

रोटरी क्लब भंडाराचा पदग्रहण सोहळा संपन्न.



  नरेंद्र मेश्राम 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

भंडारा :- जिल्ह्यात अनेक रचनात्मक उपक्रमांना साकार करणाऱ्या सेवाभावी रोटरी क्लब भंडाराचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश गिऱ्हेपुंजे, क्लब सचिव ओमकार नखाते व नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा स्थानिक सुमनोहर सेलिब्रेशन, खात रोड येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या समारंभाला रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 चे प्रांतपाल ज्ञानेश्वर शेवाळे, सहाय्यक प्रांतपाल पराग घुबडे उपस्थित होते. याशिवाय विशेष अतिथी म्हणून राजे संग्रामसिंह भोसले, डॉ. प्रफुल्ल मोकादम व शब्बीर शकीर हे रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 चे माजी प्रांतपालही उपस्थित होते.
मंचावर नवनियुक्त अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश गिऱ्हेपुंजे, माजी अध्यक्ष डॉ. योगेश जिभकाटे, नवनियुक्त सचिव ओमकार नखाते, माजी सचिव प्रा. नीता चुटे, या वेळी प्रथम महिला डॉ. दीपाली गिऱ्हेपुंजे व डॉ. विशाखा जिभकाटे उपस्थित होते.
याप्रसंगी माजी अध्यक्ष डॉ. योगेश जिभकाटे यांनी रोटरी कॉलर व पिन देऊन नवनियुक्त अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश गिऱ्हेपुंजे यांना रोटरी क्लब भंडाराचा पदभार सोपविला. त्यानंतर नवनियुक्त अध्यक्षांनी रोटरी कॉलर व पिन देऊन नूतन सचिव ओमकार नखाते यांना सचिव पदाचा पदभार दिला.
माजी सचिव प्रा. नीता चुटे यांनी रोटरी वर्ष 2024-25 साठी सादर केलेल्या अहवालात क्लबने राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. माजी अध्यक्ष डॉ. योगेश जिभकाटे यांनी त्यांच्या मनोगतातून 'व्हिजन मिशन' या प्रकल्पाचा उल्लेख केला. या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद भंडारा, रोटरी क्लब भंडारा आणि इंद्राक्षी आय केअर यांच्या संयुक्त विद्यमाने जवळपास ५० हायस्कूलमधील विद्यार्थ्यांची नेत्रतपासणी करण्यात आली. त्यामध्ये दृष्टिदोष आढळलेल्या ५० विद्यार्थ्यांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत इंद्राक्षी आय केअर येथे मोफत उपचार देण्यात आले असल्याचे सांगितले .
यावेळी प्रमुख अतिथी प्रांतपाल ज्ञानेश्वर शेवाळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, रोटरी प्लॅटफॉर्मवरून रचनात्मक कार्य करताना व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल होतो. त्यामुळे समाजाभिमुखता व जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. त्यामुळे समाजाप्रती ऋण फेडण्यासाठी रोटरीत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी मावळते अध्यक्ष डॉ. योगेश जिभकाटे यांनी क्लब अवॉर्ड्स जाहीर केले. यामध्ये 'बेस्ट रोटेरियन ऑफ द इयर' म्हणून प्रा. अशोक चुटे, शालेय मुलींना आरोग्यविषयक समुपदेशनासाठी डॉ. विनया देवळे, तसेच राष्ट्रीय युवा महोत्सव 2025 (दिल्ली) मध्ये निवड झाल्याबद्दल रोटेरियन अभिषेक ठलाल यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
याशिवाय बायसिकल असोसिएशनचे अध्यक्ष पंकज हरडे व वॉटर स्पोर्ट्स असोसिएशनचे कोच अविनाश निंबार्ते यांनाही त्यांच्या विशेष कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी रोटरी क्लब नागपूर डाउनटाउनचे अध्यक्ष चंद्रकांत आर्य, माजी अध्यक्ष वीरेंद्र पात्रीकर, डॉ. विकास इंगळे, निशिकांत काशीकर, सुनील झारखंडी, उपाध्यक्ष जगदीश लांजेवार, देशपांडे , तसेच रोटरी क्लब नागपूर मिहान टाऊनचे अध्यक्ष यावलकर व सचिव हरणे प्रमुख्याने उपस्थित होते.
या समारंभाच्या यशस्वीतेसाठी रोटरी क्लब भंडाराचे सर्व रोटेरियन – किशोर लांजेवार, प्रकाश नवखरे, प्रभात मिश्रा, डॉ. यशवंत लांजेवार, सुनील खन्ना, संदेश लाडे, नरेंद्र सेलोकर, दीपक समर्थ, अनिकेत फटीक, डॉ. रुपाली लांजेवार, हर्षल झाडे, अभिषेक ठलाल, डॉ. सुचिता वाघमारे, डॉ. विनया देवळे, डॉ. कार्तिक बालपांडे व प्रीती पारवे यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे संचालन एम.ओ.सी. प्रा. अशोक चुटे यांनी केले तर आभार प्रदर्शन क्लब सचिव ओमकार नखाते यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

0 Response to "रोटरी क्लब भंडाराचा पदग्रहण सोहळा संपन्न."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article