अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक - युवती, महिला व पुरुषां करिता ठाणे येथे मोफत - निवासी - सोलर वर आधारित प्रशिक्षण कार्यक्रम :
गुरुवार, 28 अगस्त 2025
Comment
सोनू संजीव क्षेत्रे
"साप्ताहिक जनता की आवाज"
ठाणे :- उद्योग संचालनालय महाराष्ट्र शासन, मुंबई पुरस्कृत आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एम.सी. ई. डी.) आयोजित तथा महाराष्ट्र उद्योजक, व्यापार आणि गुंतवणूक सुलभता कक्ष ( मैत्री ),मुंबई व जिल्हा उद्योग केंद्र, ठाणे यांच्या विशेष सहकार्याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष सामूहिक प्रोत्साहन योजने अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक, युवती यांच्यासाठी ४५ दिवसीय निःशुल्क निवासी सोलार वर आधारित तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम (RTEDP) आयोजित केला आहे.
ठाणे जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील (SC) आय. टी. आय/तांत्रिक डिप्लोमा किंवा पदविका पास तथा टेक्निकल शिक्षित युवक, युवती पात्र इच्छुक लाभार्थी यांच्यासाठी ४५ दिवसांचे सोलार पी. व्ही. इन्स्टॉलेशन हे
निःशुल्क निवासी तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम सोलार क्षेत्रातील नामांकित कंपनी टाटा पॉवर विद्याविहार येथे दिनांक
०४ सप्टेंबर २०२५ पासून सुरू होणार आहे. यामध्ये ३० दिवस सोलार बाबतचे संपूर्ण प्रॅक्टिकल आणि १५ दिवस उद्योजकता विकास बाबतचे मोफत प्रशिक्षण मिळणार आहे.
यासाठी ठाणे,रायगड,पालघर,रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्हयातील इच्छुक पात्र लाभार्थी मुलाखतीद्वारे निवडण्यात येणार असून मुलाखत तथा कागदपत्रे तपासणी दि. 3 सप्टेंबर २०२५ बुधवार रोजी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED), ठाणे द्वारा अचीवर्स कॉलेज, संतोषीमाता रोड, मल्हार नगर, जोशीवाग कल्याण (प). येथे सकाळी ११ ते दुपारी ०४ या वेळेत होणार आहे.
वय वर्षे १८ ते ५० वयोगटातील, किमान १० वी पास आणि आय.टी.आय. किंवा डिप्लोमा किंवा डिग्रीअसलेल्या इच्छुक उमदेवारांनी अनुसूचित जातीचा दाखला, तांत्रिक पदविका/डिग्री प्रमाणपत्र, शाळेचा दाखला, आधार कार्ड, मार्कशीट, पासपोर्ट
साइज दोन फोटो घेऊन 3 सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० ते ०४ या वेळेत वरील पत्त्यावर उपस्थित राहून सदरील मोफत निवासी तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीमती. विजू सिरसाठ उद्योग सह संचालक कोकण विभाग ठाणे, श्रीमती. सोनाली देवरे महाव्यस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, ठाणे आणि श्री. दत्तात्रय थावरे, विभागीय अधिकारी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र मुंबई/कोकण यांनी केले आहे.
संपर्का करीता :
श्री. सुबोध बायस , प्रकल्प अधिकारी, MCED ठाणे
मो. 7774053014
डॉ. संध्या येवले, कार्यक्रम समन्वयक, MCED, ठाणे
मो. 7020616492
0 Response to "अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक - युवती, महिला व पुरुषां करिता ठाणे येथे मोफत - निवासी - सोलर वर आधारित प्रशिक्षण कार्यक्रम :"
एक टिप्पणी भेजें