आत्मा अंतर्गत सेंद्रिय भात पिक शेतीशाळा संपन्न .
बुधवार, 27 अगस्त 2025
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
भडांरा: - कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा तालुका कृषि अधिकारी, भंडारा अंतर्गत मौजा *निमगाव* ता.जिल्हा भंडारा येथे आज दिनांक २७ ऑगस्ट २०२५ ला सेंद्रिय भात पीक शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले.
स्थळ: ग्राम पंचायत निमगाव
प्रक्षेत्र भेट: श्री. अंबादास चवळे पोलीस पाटील, निमगाव
वेळ: ११ वाजता
उपस्थित अधिकारी/कर्मचारी
श्री.रोशन भोयर उप कृषि अधिकारी, पहेला
श्री.गजानन गाढवे सहा.कृषि अधिकारी,पालगाव/निमगाव
प्रमुख मार्गदर्शक: सतिश वैरागडे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा, भंडारा शेतीशाळा वर्गाची सुरुवात: सतिश वैरागडे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा, भंडारा यांनी सर्वप्रथम उपस्थितांचे शब्दसुमनाने स्वागत करून मागील वर्गाचा उलगडा करून दिला. तसेच मागील वर्गात काय शिकलो ते शेतीशाळेतील विद्यार्थी यांचे कडून मनोगत घेतले.
भात पिकातील फुटवे अवस्था आणि कीड रोग व्यवस्थापन व उपाय योजना.
१.भात पिक परिसंस्था, संकल्पना व माहिती
२. भात पिक निरीक्षणे (Rice Ecosystem Analysis-RESA)
३.विविध मित्र किटक व त्यांचे भात पिकातील महत्त्व.
४. भात पिकावरील खोडकीडा
५. भात पिकावरील कडा करपा
६. एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन
७.बिजामृत, जीवामृत आणि दशपर्णी अर्क पध्दती आणि वापर याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
प्रत्येक्ष भात पिक प्रक्षेत्रावर उतरल्यावर भात पिकावरील कडा करपा, इत्यादी रोग व किडीमध्ये पाने गुंडाळणारी अळी, अंडीपुंज आढळून आल्या आणि त्यावर कृषि तज्ज्ञांनी यांनी मार्गदर्शक केले.
सदर शेतीशाळेचे आयोजन सतिश वैरागडे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा, भंडारा यांनी केले.
0 Response to "आत्मा अंतर्गत सेंद्रिय भात पिक शेतीशाळा संपन्न ."
एक टिप्पणी भेजें