-->
साकोली/सेंदुरवाफा शहर मंडळ संघटनात्मक विस्तारित बैठक संपन्न

साकोली/सेंदुरवाफा शहर मंडळ संघटनात्मक विस्तारित बैठक संपन्न

"साप्ताहिक जनता की आवाज"
 वृत्तसंस्था 

साकोली :- भारतीय जनता पार्टी साकोली, सेंदुरवाफा/सेंदुरवाफा शहर मंडळाची संघटनात्मक विस्तारित बैठक काल दिनांक १४/०८/२०२५ ला प्रकाशपर्व येथे पार पडली.यावेळी नवनियुक्त भंडारा जिल्ह्याचे भाजपा अध्यक्ष श्री आशु गोंडाने यांनी कार्यकारणीतील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले व केंद्र व राज्य सरकारचे काम पूर्ण ताकतीने जनतेपर्यंत पोहोचवायचे आहे असे यावेळी कार्यकर्त्यांना आवाहन केले. तसेच सद्यस्थितीत काँग्रेसने सुरू केलेला रडीचा डाव म्हणजेच " मतांची चोरी " हा अपप्रचार करणे सुरू केलेले आहे. या अपप्रचाराला कसे उत्तर द्यायचे याबद्दल पदाधिकाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.तसेच साकोली नगर परिषदेच्या आगामी निवडणूक कार्यक्रमासंदर्भात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले व राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात सहभागी झालेल्या रक्तदात्यांना  रक्तदान शिबिराचे प्रमाणपत्र जिल्हाध्यक्षांच्या मार्फत वाटप करण्यात आले.या बैठकीला माजी जिल्हाध्यक्ष श्री प्रकाशजी बाळबुद्धे, डॉ नेपाल रंगारी,माजी आमदार डॉ हेमकृष्णजी कापगते,जिल्हा परिषद सदस्य श्री अविनाशजी ब्राह्मणकर, जिल्हा महामंत्री श्री कांचनजी गहाणे,माजी नगराध्यक्षा सौ धन्वंता राऊत यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.प्रास्ताविक साकोली/सेंदुरवाफा शहर मंडळ अध्यक्ष व्यंकटेश येवले यांनी केले तर आभार प्रदर्शन साकोली सेंदुरवाफा शहर मंडळ महिला मोर्चा अध्यक्षा सौ प्रीती डोंगरवार यांनी केले व संचालन शहर महामंत्री श्री प्रदीपजी गोमासे यांनी केले*
     *यावेळेस मंचावर माजी आमदार डॉ.हेमकृष्णजी कापगते,भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री आशुजी गोंडाणे,माजी जिल्हाध्यक्ष प्रकाशजी बाळबुद्धे, श्री नेपालजी रंगारी प्रदेश कार्यकारिणी सदस्य,जिल्हा परिषद सदस्य श्री अविनाशभाऊ ब्राह्मणकर, श्री कांचनजी गहाणे महामंत्री भाजपा, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री प्रकाशराणा मेश्राम,श्री किशोरजी डोये, जिल्ह्याचे भाजपा सचिव श्री किशोरजी पोगडे,श्री मनीषजी कापगते, श्री प्रमोदजी प्रधान,साकोली सेंदुरवाफा शहर मंडळ अध्यक्ष व्यंकटेश येवले, जि.प.सदस्या सौ वनिता डोये, मा.जि.प.सदस्या सौ माहेश्वरी नेवारे, माजी नगराध्यक्षा सौ धन्वंता राऊत,महिला मोर्चा शहराध्यक्ष सौ प्रीती ताई डोंगरवार,महामंत्री श्री डाकरामजी कापगते,महामंत्री श्री प्रदीपजी गोमासे उपस्थित होते.*
*या सभेला प्रामुख्याने साकोली /सेंदुरवाफा शहर मंडळाची संपुर्ण कार्यकारिणी पदाधिकारी,सदस्य,बुथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते*

0 Response to "साकोली/सेंदुरवाफा शहर मंडळ संघटनात्मक विस्तारित बैठक संपन्न"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article