भाई नितीन काळे यांना लक्ष्मी टाकळी गटातून ओबीसी आरक्षण पडल्यास जिल्हा परिषद उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता
शुक्रवार, 29 अगस्त 2025
Comment
संजीव भांबोरे महाराष्ट्र
"साप्ताहीक जनता की आवाज"
सोलापूर :- भाई नितीन काळे यांना महायुतीकडून लक्ष्मी टाकळी गटातुन ओबीसी आरक्षण पडल्यास जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता.. गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रामध्ये पूर्ण वेळ अग्रेसर असलेले सोलापूर जिल्ह्यात धनगर समाज बांधवांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेतुन 1800 घरकुल मंजुर करण्यासाठी प्रयत्न करणारे व प्रयत्नांना यश मिळवणारे सर्वांच्या मदतीला धावून जाणारे एक युवा नेतृत्व नितीन काळे यांना पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी गटातुन जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे. काळे हे अनेक वर्षांपासून सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांनी अनेकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत याच त्यांच्या कार्याची दखल घेऊन अनेक राज्यस्तरीय संस्थांनी त्यांना पुरस्कार देऊन गौरविले देखील आहे. काळे हे अत्यंत कष्टाळू जिद्दी व अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतुन आलेले एक सामाजिक नेतृत्व आहे. काळे यांना राजकीय क्षेत्रामध्ये काम करीत असताना मोठ मोठ्या पदांवर काम करण्याची संधी अगदी कमी कालावधीत मिळविली आहे. वयाच्या 22 व्या वर्षी त्यांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे राज्य सचिव म्हणून जबाबदारी देण्यात आली होती त्यानंतर त्यांना भारतीय जनता पार्टी भटक्या विमुक्त आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली ही जबाबदारी काळे यांनी सक्षमपणे पार पाडली. काळे हे राज्याचे तत्कालीन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व सध्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे अत्यंत जवळचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जायचे . काळे यांचे राजकीय संबंध अनेक पक्षांच्या नेत्यांबरोबर अगदी जवळचे संबंध आहेत. सध्या काळे हे एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी असल्याचे सांगितले जाते. त्यांनी मध्यंतरी शिवसेना या पक्षात प्रवेश केला व त्यानंतर त्यांना शिवसेना या पक्षानेही त्यांना मोठी जबाबदारी दिली. काळे यांचे वकृत्व चांगले असल्याने व त्यांची काम करण्याची भुमिका चांगली असल्याने त्यांचे वरीष्ठ स्तरावर राजकीय क्षेत्रात चांगले व्यक्तीमत्व व एक धाडसी नेतृत्व म्हणून ओळख आहे. त्यामुळे काळे यांना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत जिल्हा परिषद लक्ष्मी टाकळी गटातुन ओबीसी आरक्षण पडल्यास संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. काळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले लक्ष्मी टाकळी गटातुन ओबीसी आरक्षण पडल्यास नक्कीच मला महायुतीकडून उमेदवारी मिळेल माझा माझ्या गटात थेट जनतेची चांगल्या प्रकारे संबंध आहेत मी अनेकांची कामे शासन दरबारी मांडुन त्यांना न्याय दिला आहे मला माझ्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीची जाणीव आहे त्यामुळे मी माझ्या सामान्य जनतेसाठी व त्यांना अजुन न्याय मिळवून देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करीत राहील पक्ष माझ्या कामाचा विचार करून मला नक्कीच संधी देईल जर पक्षाने अन्य कोणाला संधी दिलीच तर पक्ष देईल ती जबाबदारी सक्षमपणे पार पाडु व उमेदवार निवडून आणण्यासाठी अहोरात्र मेहनत घेईल असे काळे यांनी सांगीतले राज्याचे कर्तव्य दक्ष उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब जे सांगतील ती जबाबदारी पार पाडु असे काळे यांनी सांगितले.
0 Response to "भाई नितीन काळे यांना लक्ष्मी टाकळी गटातून ओबीसी आरक्षण पडल्यास जिल्हा परिषद उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता"
एक टिप्पणी भेजें