-->
अस्मितेचा एल्गार कार्यालयात मनोज कोटांगले यांच्या तैलचित्राचे अनावरण

अस्मितेचा एल्गार कार्यालयात मनोज कोटांगले यांच्या तैलचित्राचे अनावरण

संजीव भांबोरे
 "साप्ताहिक जनता की आवाज" 

भंडारा :- अस्मितेचा एल्गार कार्यालय भंडारा येथे सुप्रसिद्ध कव्वाल, गायक व आंबेडकरी विचारक स्मृतीशेष मनोज कोटांगले यांच्या स्मृतीला अभिवादन करून त्यांच्या तैलचित्राचे दि.२८ आॅगष्ट २०२५ रोजी आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अमृत बन्सोड यांच्या  अध्यक्षतेखाली अनावरण करण्यात आले.                  यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते महादेव मेश्राम, नाशिक चवरे, अॅड .सुरेश रामटेके, मानकर नागपूर, जेष्ठ बसपा कार्यकर्त्या प्रिया शहारे, बसपाचे माजी प्रदेश सचिव दिलीप मोटघरे, आंबेडकरी चळवळीचे नेते भाई परमानंद मेश्राम, प्रा.राहूल तागडे, भावेश कोटांगले आदी मान्यवर उपस्थित होते. स्मृतीशेष मनोज कोटांगले यांच्या संगीत क्षैत्रातील कार्याविषयी व आंबेडकरी चळवळीला त्यांनी दिलेल्या अतुल्य योगदानाविषयी उपस्थित अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले व मनोज कोटांगले यांना श्रद्धापूर्वक आदरांजली वाहिली.

        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.राहुल तागडे यांनी तर आभार प्रदर्शन भावेश कोटांगले यांनी केले. या प्रसंगी विक्रांत भवसागर, अमिता परमानंद मेश्राम, कार्तिक मेश्राम,कवी कार्तिक तिरपुडे, शहारे सर, सोमप्रभु तांदुळकर, कलाकार खोब्रागडे, तेजस कोटांगले आणि इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

0 Response to "अस्मितेचा एल्गार कार्यालयात मनोज कोटांगले यांच्या तैलचित्राचे अनावरण "

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article