-->
जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव"निसर्गाची चव, आरोग्याचा वारसा" - कविताताई उईके अध्यक्ष जि. प. अध्यक्ष,भंडारा

जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव"निसर्गाची चव, आरोग्याचा वारसा" - कविताताई उईके अध्यक्ष जि. प. अध्यक्ष,भंडारा


कुलदीप गंदे 
"साप्ताहिक जनता की आवाज"
 
भंडारा :- नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या रानभाज्या कीटकनाशक मुक्त आहेत
रोगप्रतिकारक शक्ती वाढी सोबतच अनेक व्याधींवर गुणकारी आहेत. 
 रानभाज्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवितात. सध्या श्रावणात शेतशिवारात जंगलात अनेक ठिकाणी रानभाज्या बहरल्या आहेत. अनेक महत्वपूर्ण जीवनसत्व असलेल्या  रानभाज्यांकडे  अनेकांचा कल वाढला आहे. कोणत्याही औषधाची  फवारणी न करता  बांधावर उगवलेल्या या रानभाज्यांची शेतकऱ्यांसह कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना चांगली ओळख आहे. 
या रानभाज्यांचे  जतन करणे आपले कर्तव्य असून रानभाज्यांमध्ये मध्ये असणारे जीवनसत्वे विटामिन्स प्रथिने आणि विशेषता दैनंदिन जीवनात आपला रानभाज्यांचे आरोग्यदायी महत्व आणि त्यामुळे होणारे फायदे आणि शालेय विद्यार्थ्यांना आपल्या आहारामध्ये भाज्यांचा जास्तीत जास्त वापर करून लोक पावणाऱ्या रामभाज्या व त्यांचे महत्त्व त्यासाठी एक दिशादर्शक पाऊल म्हणून आज १२ ऑगस्ट २०२५ ला क्रांतिवीर आदिवासी बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्ताने रानभाजी महोत्सव एक उत्कृष्ट प्रकारे आयोजन कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत आयोजन करण्यात आले त्या अनुषंगाने उपस्थित जिल्हा परिषद अध्यक्ष कविताताई उईके त्यांना प्रतिपादन केले.

रानभाजी महोत्सव अध्यक्ष म्हणून डॉक्टर संजय कोलते जिल्हाधिकारी,भंडारा यांनी आपल्या अध्यक्ष भाषणामध्ये रानभाज्या निसर्गतः उपलब्ध होत असून निसर्गात उपलब्ध होत असणाऱ्या एक वैविध्यपूर्ण देणगी म्हणून या श्रावणात रानभाज्यांचे महत्त्व त्यांची ओळख त्यामध्ये असणारे जीवनसत्वे आणि विशेषता रसायनमुक्त असून त्यांच्या जास्तीत जास्त नागरिकांनी शालेय विद्यार्थ्यांनी वापर करून शरीरात असणाऱ्या जीवनसत्वाची कमतरता भरून काढावी असे मोलाचे प्रतिपादन डॉक्टर संजय कोलते जिल्हाधिकारी, भंडारा यांनी केले.

या महोत्सवात रानातील नैसर्गिकरीत्या उगवल्या जाणाऱ्या जवळपास ६० प्रकारच्या रानभाज्या प्रदर्शनामध्ये ठेवून त्यांचे महत्व प्रकल्प संचालक आत्मा, भंडारा उर्मिला चिखले यांनी यांनी समजावून सांगितले. 
रानभाज्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळून येत असून  विशेष म्हणजे या भाज्या नैसर्गिकरित्या येत असून यावर कसल्याही प्रकारची कीटकनाशक फवारणी करण्यात येत नाही. यामुळेच अत्यंत पौष्टिक असल्याने या रानभाज्या सकस असल्याचे सांगितले.

*रानभाज्यांचे  आहारातील महत्व* तांदुळजा भाजी  'क' व 'अ' जीवनसत्व विपुल असून रोगप्रतिकार शक्ती वाढीसाठी उपयुक्त. उष्णता व दाह कमी करते, मलावरोध दूर करते.  फांद भाजी ही वेल वर्गीय असून याची पाने खाद्य असतात. पित्तविकार दूर करणारी, निद्रा येण्यासाठी उपयुक्त आहे. अंबाडी भाजी क' व 'अ' जीवनसत्व, लोह, झिंक, कैल्शियम यात विपुल प्रमाणात असतात. 
गुणाने असून रोगप्रतिकार शक्ती वाढवते. म्हैसवेल भाजी 'अ' जीवनसत्व वाढवणारी, पोटाच्या विकारात लाभदायी आहे असे तांत्रिकदृष्ट्या मंगला डहाके आहारतज्ञ यांनी उपस्थिताना समजावून सांगितले.

जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाची रीतसर प्रास्ताविक नीरज मोरे प्रकल्प अधिकारी आदिवासी विभाग भंडारा यांनी करून आपल्या प्रास्तावितेमध्ये रानभाज्यांचे महत्त्व आणि आरोग्य दृष्टीने असणारे फायदे त्यानी आपल्या प्रास्ताविक भाषणात सांगितले.

 *विशेषतः* *सदर महोत्सवात गुड्डू हातझाडे मुक्काम कोका जंगल तालुका भंडारा यांनी महोत्सवामध्ये त्यांनी त्यांच्या शेतामध्ये लागवड केलेल्या उत्कृष्ट पद्धतीने रसायनमुक्त पद्धतीने पिकविलेल्या आठ हजार रुपयाची ड्रॅगन फ्रुट विक्री केली.* 

सदर महोत्सवात १२००० रुपयांची शेतकऱ्यांनी राभाज्यांची विक्री केली (काटवल,पातूर,बांबू वासते,सात्या,वराकली,खपरखुट यांची विशेष विक्री.)
आहार तज्ञ डहाके मॅडम यांनी रानभाजीचे आरोग्यासाठी महत्व आणि असलेल्या गुणधर्म, पाककला याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.

सदर महोत्सव उत्तम आणि नियोजनपूर्वक करण्याकरिता कृषि अंतर्गत अधिकारी, कर्मचारी, आत्मा अंतर्गत अधिकारी कर्मचारी, स्मार्ट अंतर्गत अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामिण जीवोन्नती अभियान अंतर्गत विभाग समन्वयक, कृषि, पशू सखी,आत्मा अंतर्गत गट,शेतकरी उत्पादक कंपनी शेतकरी यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून महोत्सव योग्यरित्या पार पडला.

सदर महोत्सवाला तालुका कृषी अधिकारी अशोक जिभकाटे, भंडारा ,शांतीलाल गायधने मुल्यसागरीतज्ञ स्मार्ट, भंडारा सविता खेडीकर तालुका व्यवस्थापक ग्रामीण जीवन्नोती अभियान, भंडारा उपस्थित होते.
जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे सूत्रसंचालन शेंडे मुख्याध्यापक चांदपूर यांनी केले तर आभार प्रदर्शन बडगे साहेब प्रकल्प अधिकारी भंडारा यांनी केले.

0 Response to "जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव"निसर्गाची चव, आरोग्याचा वारसा" - कविताताई उईके अध्यक्ष जि. प. अध्यक्ष,भंडारा"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article