-->
आमदार रामदास मसराम यांची जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीला भेट

आमदार रामदास मसराम यांची जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीला भेट

"साप्ताहिक जनता की आवाज 
वृत्त प्रतिनिधी 

कोरची :- आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदासजी मसराम यांनी तालुका कोरची अंतर्गत टेमली गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि अंगणवाडी केंद्राला भेट दिली.
यावेळी आमदारांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती घेतली.
विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेत त्यावर तातडीने तोडगा काढण्याचे आश्वासन आमदार रामदास मसराम यांनी दिले.
शाळेतील शिक्षकांशी चर्चा करून शैक्षणिक गुणवत्तेच्या उन्नतीसाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
अंगणवाडीतील बालकांची विचारपूस करून त्यांच्या पोषण स्थितीबाबत माहिती घेतली.
लहान मुलांना पौष्टिक आहार आणि शैक्षणिक साहित्य उपलब्ध व्हावे यासाठी तत्काळ पावले उचलण्याचे आश्वासन दिले.
गावातील पालकांना आपल्या मुलांना नियमित शाळेत पाठविण्याचे आवाहन आमदार रामदास मसराम यांनी केले.
या प्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रगती करण्यासाठी प्रोत्साहित केले.
शैक्षणिक सुविधा आणि पायाभूत सोयी सुधारण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्याचेही आमदारांनी स्पष्ट केले.
गुणवत्तापूर्ण शिक्षण हे ग्रामीण भागाच्या प्रगतीसाठी अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
गावातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या शैक्षणिक अपेक्षा जाणून घेतल्या.
या भेटीत शिक्षक, ग्रामपंचायत सदस्य, पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदारांच्या या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत करण्यात आले.

त्या वेळी सोबत :काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष कोरची मनोजभाऊ अग्रवाल, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष कुरखेडा जीवन पाटील नाट, जिल्हा परिषद सदस्य रामसुराम काटेंगे, सागर वाढई, वाशिम शेख, कमलेश बारस्कर, मुख्याध्यापक नुरुटी सर, तुमराम मॅडम, अंगणवाडी सेविका घोडाम मॅडम,महेश करशी,संजय कराली,ब्रह्म सहाळा, रातीराम घाटघुमर,

शिक्षणाच्या माध्यमातून समाजाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प आमदार रामदास मसराम यांनी व्यक्त केला.
टेमली येथील ग्रामस्थांनी आमदारांचे मनःपूर्वक आभार मानले.

0 Response to "आमदार रामदास मसराम यांची जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीला भेट"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article