अड्याळ येथील सरपंच शिवशंकर मुंगाटे यांचा वाढदिवस अनेक विकास कामाने उत्साहात साजरा
शुक्रवार, 29 अगस्त 2025
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- पवनी तालुक्यातील अड्याळ येथील सरपंच शिवशंकर मुंगाटे यांचा वाढदिवस आज दिनांक 29 ऑगस्ट 2025 ला गणेश सभागृह येथे अनेक विकासकामाने कामाचे भूमिपूजन व पूर्ण झालेल्या कामाचे लोकार्पण , शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप, शेतीनिष्ठ शेतकरी यांचा सहपत्नीक सत्कार , 10 वि व 12 मध्ये प्राविण प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम प्रेस संपादक व पत्रकार संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी सरपंच शिवशंकर मुंगाटे यांचा ग्रामपंचायत अड्याळ येथे शाल, सन्मानचिन्ह , व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. वाढदिवस कार्यक्रमानिमित्त भाजपाचे भंडारा जिल्हाध्यक्ष आशु गोंडाने, विनोद बांते जिल्हा परिषद सदस्य भंडारा, जिल्हा परिषद सदस्या सुवर्णाताई मुंगाटे, प्रशांत खोब्रागडे पंचायत समिती भंडारा,ग्राम विकास अधिकारी कुमारी पौर्णिमा साखरे, ग्रामपंचायत सदस्य विपिन टेंभुर्णे, ग्रामपंचायत सदस्य नम्रता मडकवार, ग्रामपंचायत सदस्या मनोरमा मडावी, ग्रामपंचायत सदस्य आशिष अंबादे, ग्रामपंचायत सदस्या वसुश्री टेंभुर्णे, ग्रामपंचायत सदस्या यामिनी निकोडे व अनेक मान्यवर विचार मंचावर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्याकरता सामाजिक कार्यकर्ते विकास टेंभुर्णे,ग्रामपंचायत चे कर्मचारी रामा न्यायमूर्ती, दिनेश ढवळे, सुभाष वंजारी ,पवन वंजारी, सचिन मलोडे, पवन जिभकाटे, विनेश भोवते, गणराज लांजेवार,अमित रामटेके ,सुधीर देशमुख, मधुकर देशपांडे यांनी सहकार्य केले. यावेळी अनेक नागरिक ,महिला ,युवक प्रामुख्याने उपस्थित होते.
0 Response to "अड्याळ येथील सरपंच शिवशंकर मुंगाटे यांचा वाढदिवस अनेक विकास कामाने उत्साहात साजरा "
एक टिप्पणी भेजें