पाश्चात्यकरणाला विरोध आधुनिकतेला नाही!.. पंथ, संप्रदायांना सुझाव. -- मा.नितीन गडकरी.
सोमवार, 1 सितंबर 2025
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्त प्रतिनिधी
नागपूर : तंत्रज्ञानाचा उपयोग हा विकासासाठी केला पाहिजे पास्चत्यकरणाला आणि आधुनिकरण ह्या दोन्हीवेगवेगळ्या सकंल्पना आहेत.
आमच्या आधुनिकरणाला विरोध नाही.पास्चत्यकरणाला आहे.असे मा.गडकरी यांनी मत व्यक्त केले.
मंत्री जिथे घुसतात तिथे ते आग लावल्याशिवाय राहत नाहीत, त्यामुळे पंथ आणि संप्रदायांनी त्यांना दूर ठेवावे असा परखड सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये एका कार्यक्रमादरम्यान दिला. धर्मकारण, समाजकारण आणि राजकारण या वेगवेगळ्या गोष्टी आहेत.असे मत रविवारी रेशीमबाग परिसरातील कविवर्य सुरेश भट सभागृहात महानुभाव पंथीय संमेलनात व्याक्त केले.
तसेच यावेळी गडकरी म्हणाले, 'सुरेश भट सभागृह बांधायला घेतले तेव्हा लोकांनी त्याला विरोध केला. तेव्हा महाराजांना मी सांगितले की सरकारपासून दूर राहत जा. तुम्ही वारंवार सरकारला मागण्या करत राहता तुम्हाला जे काम करायचे आहे ते करून घ्या. आमच्या सारखे लोकं आहेत मग कोणत्याही पक्षाचे सरकार असो त्याच्यां मंत्र्यांना गळ्यात माळ घालत जा व आपले काम करुन घेत चला.
राजकारण म्हणाल तर आम्ही असे आहोत की जिथे घुसतो, तिथे आग लावल्याशिवाय नाही राहत. मग महंत आपसात भांडायला लागतात की तू की मी ? गादीसाठी भांडणे, मग आम्ही स्थगिती देतो, मग समिती नेमतो आणि दोन्ही महंत आमच्याकडे चकरा मारतात.आणि दोन्ही पक्षांची आग जळत राहते असे संत संमेलनात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन व पंच उपहार सोहळ्याप्रसंगी मंचावर बोलताना आपले प्रखळ मत माननीय नितीन गडकरी केंद्रीय मंत्री यांनी व्यक्त केले.
0 Response to "पाश्चात्यकरणाला विरोध आधुनिकतेला नाही!.. पंथ, संप्रदायांना सुझाव. -- मा.नितीन गडकरी."
एक टिप्पणी भेजें