लेख -- धर्मशिल्प जीवाचा खरा जन्म
शनिवार, 13 सितंबर 2025
Comment
संकलीत :- हर्षवर्धन देशभ्रतार
"साप्ताहिक जनता की आवाज"
वास्तविक पाहिल्यास जीवाला जन्ममृत्यू नाही. तो नित्य आहे. परंतु आपल्या व्यवहारिक भाषेनुसार जेव्हापासून जीव कार्यरत झाला त्यालाच जन्माची संज्ञा द्यावी लागेल .
'मातेच्या 'उदरातुन बाहेर' पडणे म्हणजेच जन्म असा असा जन्माचा अर्थ आपण सर्व सामान्यपणे काढतो.
परंतु आपल्या अध्यात्मिक शास्त्राप्रमाणे विचार केला असता जन्माची व्याख्या एक वेगळीच होते.
जन्म म्हणजे {मातेच्या} गर्भात सात महिन्यांचा संपूर्ण पिंड तयार होऊन तेथे सर्व देवतांची अधिष्ठाने आली, पिंडस्था आल्या म्हणजे जन्म झाला असे म्हणायचे असे स्वामींचे शास्त्रानुसार हा जन्म शब्दाचा दुसरा एक अर्थ आहे.
'चैतन्यमहऺ जीवा जन्म बोलीजे'{सऺस.६} ही जन्माची एक व्याख्या आहे. तमो मायेच्या स्वरूपातून बाहेर पडता पडता जीवाला आद्यमळ लागणे व माया दत्त सामर्थासहित हरित माया स्वरूपात येऊन पडणे हाच जिवाचा जन्म होय. म्हणजेच परमेश्वराने ज्यावेळेस ही सृष्टी तयार केली त्यावेळेस हा जीव तमो स्वरूपात मग्न होता. त्यावेळेस ईश्वर आज्ञाने माया शक्तीने जीवाला तिचा मळ लावला मळ लागल्याबरोबर जीव चैतन्यमहऺ बोलीला. मी स्वतःच एक माया शक्ती आहे असे अन्यथा ज्ञान त्याला निर्माण झाले. हाच त्याचा मूळ जन्म म्हणावा लागेल. अशाप्रमाणे जीवाच्या जन्माची व्याख्या आहे.
त्याचप्रमाणे भोगभुमीचा मनुष्य.... कर्मभूमीत आला तर त्या मनुष्याचा पिंड युक्त होतो. युक्त होतो म्हणजे मनुष्य देहात देवतांच्या ज्या काही पिंडस्था असतात त्यातील काही पिंडस्था भोगभुमीत जन्म मिळाल्यावर अथवा भोग भूमीत गेल्यानंतर त्या निघून जातात.{कर्मभूमीच्या पिंडस्था} आणि कर्मभूमीत आल्यानंतर त्या पुन्हा कर्मभूमीच्या पिंडस्था असतात त्या देहामध्ये येतात म्हणजेच तो मनुष्य संपूर्ण पिंड युक्त होतो. आणि त्याची कर्म निष्पत्ती चालू होते. म्हणजेच व भोगभूमीतून कर्मभूमीत आल्यानंतर त्या जीवाचा जन्मच म्हणावा लागेल. असो.
'जन्म'म्हणजे अनुसरणानंतरचा काळ, हा सुद्धा अर्थ या ठिकाणी अभिप्रेत आहे.
आचारत्या पुरुषाच्या दृष्टीने त्याचे अनुसरण हाच त्याचा खरा खुरा जन्म होय. कारण अनुसरणानंतर तो कर्मरहाटीतून निघून दैवराहाटीत जणू 'जन्म' घेत असतो. आणि म्हणून त्याच्या दृष्टीने अनुसरणानंतरचा काळ हाच त्याचा 'जन्म' होय.
आ. प. सेवक
राहुल दर्यापूरकर
0 Response to "लेख -- धर्मशिल्प जीवाचा खरा जन्म"
एक टिप्पणी भेजें