धम्मध्वज तथा मशाल यात्रेचे भंडारा येथे आज आगमन.
शनिवार, 20 सितंबर 2025
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्त प्रतिनिधी
भंडारा :- महाबोधी महाविहार बुद्धगया चे प्रबंधन बौद्धांच्या हाती सोपवावे, तसेच बी टी एक्ट निरस्त करण्यात यावे या मागणी साठी सम्पूर्ण भारत भर जनजागृति व्हावी या उद्देशाने या मुक्ति आन्दोलनाचे प्रेरक पूज्य विनाचार्य तथा भदंत Dnyanjyoti , यांच्या नेतृत्वात धम्मध्वज यात्रा भारतभर भ्रमण करित आहे. त्याचप्रमाणे भदंत धम्मशिखर यांच्या नेतृत्वात मशाल यात्रेचे सुद्धा भ्रमण सुरु आहे.
या दोन्ही यात्रा दिनांक 20 सेप्टेंबर 2025 ला भंडारा येथे येत आहेत. भंडारयात सुद्धा ह्या दोन्ही यात्रा चे स्वागत व पूज्य भदंत यांचे मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. सदर कार्यक्रम इंद्रलोक सभागृह , नागपुर रोड येथे होणार आहे. ततपुर्वी धम्मध्वज यात्रेला दुपारी 5 वाजता मैत्रेय बुद्ध विहार , नाशिक नगर येथून सुरुवात होवून शास्त्री चौक होत गांधी चौक ते त्रिमूर्ति चौकात येईल, इंद्रलोक सभागृहात यात्रेचे सभेत रूपांतर होवून पूज्य भंते तथा मान्यवरांचे मार्गदर्षन बोधगया महाविहाराच्या मुक्ति आन्दोलनाची दिशा व भूमिका लोकांसमोर मांडली जाईल.
सभेला पूज्य भंते ज्ञानज्योति , मा. विनाचार्य, भंते सुरेई ससाई, भन्ते धम्मशिखर,व मान्यवरांची उपस्थिति राहणार आहे.
भंडारा शहरातील सर्व बौद्ध उपासक ,उपसिकांना कार्यक्रम स्थळी उपस्थित राहावे तसेच धम्मध्वज यात्रे मधे मोठ्या संख्येने सामिल व्हावे असे आवाहन महाबोधी महाविहार मुक्ति आंदोलन समिति भंडारा जिल्हा यांच्या तर्फे करण्यात येत आहे.
कार्यक्रमाच्या पूर्वी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक विकास राजा भीमबुद्ध गीतां द्वारे प्रबोधनाचा कार्यक्रम करतील असे आयोजन महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन संघर्ष समिती भंडारा जिल्हा चे संयोजक असित बागडे युवराज रामटेके, शशिकांत भोयर, मनोज खोब्रागडे, अचल मेश्राम, हंसराज वैद्य, विनय बनसोड, राजेश मडामे, नरेंद्र मेश्राम, श्रीकृष्ण देशभ्रतार तथा इतर पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
.
0 Response to "धम्मध्वज तथा मशाल यात्रेचे भंडारा येथे आज आगमन."
एक टिप्पणी भेजें