शेतकऱ्याच्या शेतातील पाणी पाहू नका तर शेतकऱ्याच्या डोळ्यातले पाणी पाहून सरकारने मदत करावी.-- लक्ष्मण कांबळे
मंगलवार, 30 सितंबर 2025
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
लातूर :- सध्या महाराष्ट्रात प्रमाण पेक्षा पाऊस झाला असून अनेक शेतकऱ्यांचे कधी भरून न निघणारे नुकसान झाले आहे.हे आपण सर्वजण उघड्या डोळ्याने पाहत आहोत अनेक शेतकऱ्याच्या शेतात पिकाच्या वर पाणी थांबले असून शेताला तळयाचे सवरुप झाले तर अनेक शेतकार्याच्या शेतातील माती खरडून वाहून गेली अनेकाची जनावरे वाहून गेली अशी परस्थिती या पूर्वी कधी झाली नव्हती या परिस्थितीतून शेतकरी राजा कसा बाहेर येईल याचा प्रश्न सर्व शेतकऱ्यां समोर आहे सरकारचे मंत्री, राजकारणी पुढारी हे शेतकऱ्याचे झालेल्या नुकसानीचे पाहणी दौरे करत आहेत आणि निघून जात आहे पंचनामे करून मदत करण्याचे आवाहन केले असेल तरी सरकारने जाहीर केलेली रक्कम तुटपुंजी असून सरकारने भरीव वाढ करून तत्काळ दिवाळी पूर्वी मदत शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करावी पंचनामे करण्याचे निकष रद्द करावेत जनेकरून पंचनामा करण्यासारखं त्या शेतात काय राहीलच नाहीतर पंचनामा करणार काय पंचनामा न करता सर्व शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये मदत करावी मदत करण्यासाठी तत्परता दाखवावी जिकडे पाहवे तिकडे सर्व दूर पाणीच पाणी झाले आहे .तरी सरकारने शेतकऱ्याच्या शेतातील पाणी न पाहता शेतकऱ्या .त्याच्या कुटुंबाच्या डोळ्यातील पाणी पाहवून तत्काळ दिवाळी पूर्वी मदत करावी
जगाच्या पोशिंदा याचेवरेती अस्मानी संकट कोसळल आहे त्यांचे कधीच भरून न निघणारे नुकसान झाले आहे कर्ज काढून शेतकरी राजाने पेरणी केली होती आणि आता हाताला आलेली पिके पाण्याखाली गेली,गुर वाहून गेली, शेतात पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले शेतकऱ्याला शेतात जाण्यासाठी वाट राहिली नाही तर पंचनामे करणारे शेतात जाऊन पंचनामे करणार कसे सरकारने शेतकऱ्याची तूट पंजी रक्कम देवून चष्टा करू नये अन्यथा आम्हाला सरकारचेच विरोधात आंदोलन करावे लागेल
या अस्मानी संकटातून शेतकरी राजा सावरला पाहिजे हे सरकारने लक्षात ठेवावे
0 Response to "शेतकऱ्याच्या शेतातील पाणी पाहू नका तर शेतकऱ्याच्या डोळ्यातले पाणी पाहून सरकारने मदत करावी.-- लक्ष्मण कांबळे "
एक टिप्पणी भेजें