-->

Happy Diwali

Happy Diwali
पुरोगामी महाराष्ट्रात बौद्ध कुटुंबावर जातीवादी लोकांनी टाकला बहिष्कार

पुरोगामी महाराष्ट्रात बौद्ध कुटुंबावर जातीवादी लोकांनी टाकला बहिष्कार

• आरोपीला तत्काळ अटक करा अन्यथा  तीव्र आंदोलन--  भीम आर्मीचा ईशारा.
• पोलिस स्टेशनला ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल असूनही आरोपी मोकाट  

 संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज"
 
नागपूर :- लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील डोमगाव या गावातील बौद्ध समाजावर बहिष्कार टाकले गुन्हेगारांची  पाठराखण  करणाऱ्या पोलिसावर कायदेशीर कारवाई करावी असे निवेदन भीम.आर्मिच्या वतीने उदगीर येथे  उपजिल्हाधिकारी कार्यालयाला दिनांक २६ सप्टेंबर२०२५ रोजी उदगीर उपजिल्हाधिकारी यांना भीम आर्मीचे  निवेदन दिले .
र्बौद्ध समाज पावसामध्ये न्यायाच्या प्रतीक्षेत बसलेला आहे. लातूर जिल्ह्यातील  जळकोट तालुक्यात डोमगाव या गावच्या बौध्द समाजातील भानुदास वाघमारे या व्यक्तीच्या गाडीवरती *अशोक चक्र आणि डॉक्टर* *बाबासाहेब आंबेडकर यांची* *स्वाक्षरी असलेले स्टिकर होते* म्हणून गावातील  मनुवादी  विचार श्रेणीच्या व्यक्तीने त्याच्या आईच्या मदतीने तुझ्या गाडीवरील अशोक चक्र आणि कोणाची सही आहे हे काढून टाक असे म्हणत जाती वादातून मारहाण  करून  गावातील  बौद्ध समाजावर सामाजिक बहिष्कार टाकून  दैनंदिन जीवना आवश्यक  वस्तू  पाणी, किराणा दुकानातील समान  गावात फिरणे बंद  शिवाय दळण,  आणणे  दुधावर बंदी  आदी  बाबीवर  बंदीकेली  प्रवासाची बंदी पुरोगामी महाराष्ट्रात मानव जातीला काळीमा फासणारी वागणून  लोकांनी केली आहे  सदर गावांमध्ये  जेम तेम  पाच ते सहा   बौद्ध समाजाचे घरे असून  मनुवादी लोकांकडून  वारंवार जीवे मारण्याच्या  धमकी येत आहेत म्हणून जळकोट येथील पोलीस स्टेशनमध्ये ॲट्रॉसिटीनुसार १२सप्टेंबर २०२५  रोजी गुन्हा दाखल  असूनही  आरोपी अद्याप पोलिस प्रशासनाकडून आरोपीच्या विरोधात कारवाई करण्यात आलेली नाही. आरोपीवर गुन्हा दाखल असून ही आरोपी अटक न करणे हे संशयास्पद आहे. म्हणून
  बौद्ध समाजांनी उदगीर येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या लहान मुला बाळासह भर पावसामध्ये बेमुदत धरणे आंदोलन सुरू  असून  उप जिल्हाधिकारी याचे कडून तरी काय न्याय मिळेल का या अशाने  बौद्ध समाज  भीती  पोटी आपला जीव वाचवा म्हणून   करत आहेत आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी  भीम आर्मीच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला  उदगीर उपजिल्हाधिकारी  यांना निवेदन देऊन  संबंधित आरोपी वरती कायदेशीर कारवाई करून पीडित कुटुंबांना न्याय  देवून  त्यांचे तत्काळ  पुनर्वसन जळकोट शहरांमध्ये करावे असे निवेदनात   मागणी केली आहे.यावेळी भीम आर्मीचे माजी मराठवाडा अध्यक्ष,,भीम आर्मी लातूर जिल्हा कार्याध्यक्ष बबलू गवळे , लातूर शहर अध्यक्ष संदीप कांबळे, उदगीर शहराध्यक्ष राहुल कांबळे,जळकोट तालुका अध्यक्ष विकास वाघमारे
   आदी भीम आर्मीचे  पदाधिकारी हजर होते
 आरोपीवर योग्य ती कायदेशीर कारवाई  करून तत्काळ विना  विलंब पीडित कुटुंबाचे पुनर्वसन जळकोट शहरात करावे अन्यथा  तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजी भीम आर्मी मराठवाडा अध्यक्ष विनोद कोल्हे  यांनी असा इशारा  दिला आहे

0 Response to "पुरोगामी महाराष्ट्रात बौद्ध कुटुंबावर जातीवादी लोकांनी टाकला बहिष्कार "

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article