-->

Happy Diwali

Happy Diwali
पाणंद रस्ते व सर्वांसाठी घरे कार्यक्रम प्राधान्याने राबविणार : पालकमंत्री.

पाणंद रस्ते व सर्वांसाठी घरे कार्यक्रम प्राधान्याने राबविणार : पालकमंत्री.


• जनता दरबारातून 240 तक्रारी निकाली व जिल्ह्यात 7 नमो उद्यान.

• धान उत्पादकांना 114 कोटीचे वितरण लवकरच.

"साप्ताहिक जनता की आवाज" 
वृत्त प्रतिनिधी 

भंडारा :- पाणंद रस्ते व सर्वांसाठी घरे हा कार्यक्रम प्राधान्याने राबविणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले. हेमंत सेलिब्रेशन येथे छत्रपती शिवाजी महाराज महाजस्व अभियानांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा यांच्या वतीने 'सेवा पंधरवडा' या उपक्रमाचा शुभारंभ आज पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला आ. नरेंद्र भोंडेकर, आ. राजू कारेमोरे तसेच माजी खा. सुनील मेंढे,

जि. प पदाधिकारी आनंद मलेवार, रसीका रंगारी, कल्पना कुझेकर, जिल्हाधिकारी सावनकुमार उपस्थित होते.

यावेळी बोलतांना पालकमंत्री म्हणाले

की, लोकाभिमुख प्रशासन हे या शासनाचे ब्रीद आहे. त्यातूनच सेवा पंधरवाडा उपक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत पाणंद रस्ते व सर्वांसाठी घरे कार्यक्रम

प्राधान्याने राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात पाणंद रस्तेविषयक मोहीम दि. १७ ते २२ सप्टेंबर या कालावधीत पाणंद व शिवार रस्त्यांना क्रमांक देणे, त्यांचे सर्वेक्षण करणे, गावाच्या नकाशावर चिन्हांकित करणे आणि पत्रकात नोंद नसलेल्या रस्त्यांची नोंद करणे यावर लक्ष केंद्रित केले जाईल. तसेच, शेतावर जाण्यासाठी रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी संमतिपत्रे घेणे आणि प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी 'रस्ता अदालत' आयोजित केली जाईल.

दुसऱ्या टप्प्यात 'सर्वांसाठी घरे' उपक्रम दि. २३ ते २७ सप्टेंबर या टप्प्यात 'सर्वांसाठी घरे' या उपक्रमासाठी पूरक कार्यवाही केली जाईल. यामध्ये घरे बांधण्यासाठी उपलब्ध असलेली शासकीय जमीन कब्जेहक्काने देणे, शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे

नियमनुकूल करणे व अतिक्रमण नियमित केलेल्या तसेच जमीन वाटप झालेल्या लाभार्थ्यांना जमिनीचे पट्टे वाटप करणे यावर भर दिला जाईल.

जनता दरबाराचे फलद्रुप म्हणजे ४८८ तक्रारीपैकी २४० तक्रारी निघाल्या आहेत. नागरिकांचा सकारात्मक असा प्रतिसाद या जनता दरबाराला मिळत आहे. जिल्हयात नगरपालीका आणि नगरपरिषदा क्षेत्रात ७ नमो उद्याने निर्माण करण्यात येतील. धान उत्पादकासाठी शेतकऱ्यांकडून ११४ कोटी प्राप्त झाले असून लवकरच तो निधी शेतकऱ्यांच्या खाती वर्ग करण्यात येईल, असेही त्यांनी आश्वासीत केले.

यावेळी आ. नरेंद्र भोंडेकर यांनी जिल्ह्याच्या विकासाला पालकमंत्री यांच्या दौऱ्यांमुळे गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला, तर आ. राजू कारेमोरे यांनी प्रशासनाने सेवा पंधरवाडयातील सेवा

नागरिकांना देण्यासाठी हेड टु टेल काम करण्याची गरज व्यक्त केली. माजी खा. सुनील मेंढे यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात नागरिकांना उत्पन्न, अधिवास, रहीवासी दाखल्यांचे वाटप पालकमंत्री भोयर यांच्या हस्ते करण्यात आले. सेवा पंधरवडा' अभियानाची अंमलबजावणी तीन टप्प्यांत केली जाणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात 'सर्वांसाठी घरे' उपक्रम दि. २३ ते २७ सप्टेंबर या टप्प्यात 'सर्वांसाठी घरे' या उपक्रमासाठी पूरक कार्यवाही केली जाईल. यामध्ये घरे बांधण्यासाठी उपलब्ध असलेली शासकीय जमीन कब्जेहक्काने देणे, शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमनुकूल करणे व अतिक्रमण नियमित केलेल्या तसेच जमीन वाटप झालेल्या लाभार्थ्यांना जमिनीचे पट्टे वाटप करणे यावर भर दिला जाईल.

0 Response to "पाणंद रस्ते व सर्वांसाठी घरे कार्यक्रम प्राधान्याने राबविणार : पालकमंत्री. "

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article