जुलै २०२४ पंचवीस मधील शेतकऱ्यांचे ध्यानाचे चुकारे न दिल्यास २९सप्टेंबरला जिल्हा मार्केटिंग न्यायालयाचा लिलाव करू--- माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे
बुधवार, 24 सितंबर 2025
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- सन २०२४ -२५ मधील माहे जुलै मधील आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान विकणाऱ्या शेतकऱ्यांच्या धानाचे चुकारे तात्काळ देण्यात यावे, अन्यथा 29 सप्टेंबर २०२५ ला जिल्हा मार्केटिंग कार्यालय भंडारा यांचा लिलाव करू असा इशारा माझी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे यांनी पत्रकार संजीव भांबोरे यांच्याशी बोलताना सांगितले. सविस्तर वृत्त असे की ,उन्हाळी धान उत्पादक शेतकऱ्यांनी शासनाचे आधारभूत धान खरेदी केंद्रावर सन 2024 -25 मध्ये जुलै महिन्यात ,धान दिले असून धान्याचा पेमेंट अजून पर्यंत झालेले नाही. १४ऑगस्ट २०२५पासून मुख्यमंत्री यांचे नागपूर येथील निवासस्थानासमोर आमरण उपोषण आंदोलन करण्याचा निवेदन देण्यात आले होते .त्यावेळी ऑनलाईन करणाऱ्या शेतकऱ्यांना बोनस २०२४- २५ मधील मे व जून २०२५ या महिन्याचे धान्याचे पैसे देण्यात आले. मात्र माहे जुलै 2025 मध्ये शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान विकणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या धानाचे पैसे अजून पर्यंत मिळाले नाहीत तसेच काही शेतकऱ्यांना बोनस सुद्धा मिळाला नाही. जिल्हा पणन अधिकारी भंडारा यांनी पोलीस स्टेशन दिघोरी येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना ८ दिवसांच्या आत जुलै 20२५ मध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या धानाचे चुकारे देण्यात येतील असे दिनांक १४ ऑगस्ट २०२५ रोजी लिखित आश्वासन दिले होते. परंतु अजून पर्यंत शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही. शेतकऱ्यांना खरीप हंगामात त्यांच्या शेतीसाठी पैशाची खूपच गरज असते मात्र अजून पर्यंत पैसे न मिळाल्याने शेतकरी फारच आर्थिक अडचणीत सापडलेला आहे मजुरी ट्रॅक्टर भाडा ,खत ,औषधी साठी लागणारे पैसे शेतकऱ्यांकडे नसल्याने खाजगी सावकाराच्या दारात जावे लागत आहे त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक अडचण लक्षात घेता 28 सप्टेंबर २०२५ पर्यंत शेतकऱ्यांचे पैसे देण्यात आले नाही तर २९सप्टेंबर रोजी जिल्हा मार्केटिंग कार्यालय भंडारा यांचे लिलाव करण्याचा इशारा माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे यांनी दिलेला आहे. अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, जिल्हाधिकारी साहेब भंडारा ,जिल्हा पणन अधिकारी भंडारा ,पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन भंडारा यांना देण्यात आलेले आहे.
0 Response to "जुलै २०२४ पंचवीस मधील शेतकऱ्यांचे ध्यानाचे चुकारे न दिल्यास २९सप्टेंबरला जिल्हा मार्केटिंग न्यायालयाचा लिलाव करू--- माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे"
एक टिप्पणी भेजें