भंडारा येथे धम्मध्वज मशाल यात्रेचे आगमन
बुधवार, 24 सितंबर 2025
Comment
• महाबोधी महाविहार बौद्धांच्या हाती येणार नाही तोपर्यंत लढा सुरू राहणार -भंते पूज्य विनाचार्य.
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी
भंडारा :- महाबोधी महाविहार बौद्धांच्या हाती सोपविण्यात यावे तसेच 1949 चा बीटी अॅक्ट रद्द करण्यात यावा या प्रमुख मागणी करिता संपूर्ण भारतभर महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे प्रणेते पूज्य भंते विनाचार्य यांच्या नेतृत्वात संपूर्ण भारत भ्रमण करीत आहेत .त्याचप्रमाणे भदंत धम्म शेखर यांच्या नेतृत्वात यात्रेचे सुद्धा भ्रमण होत आहे. धम्म ध्वज यात्रेचे 20 सप्टेंबर 2025 ला भंडारा येथील शहरात आगमन झाले. यावेळी मैत्री बुद्ध विहार नाशिक नगर येथून धम्म ध्वज यात्रेला सुरुवात होऊन शास्त्री चौक गांधी चौक, त्रिमूर्ती चौक ,भ्रमण करीत इंद्रलोक सभागृह नागपूर येथे सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेला भंते ज्ञानज्योती ,पूज्य भंते विनाचार्य भंतेस सुरेई
ससाई भंते, धम्शिखर व अनेक मान्यवरांची उपस्थिती होती .यावेळी मार्गदर्शन करताना भन्ते विनाचार्य यांनी सांगितले की ,ज्याप्रमाणे मुस्लिम समाजाच्या मज्जिद मध्ये मुस्लिम धर्मगुरू असतात. ख्रिश्चन समाजाच्या चर्चमध्ये फादर असतात .त्याच प्रमाणे बौद्ध समाजाचे असलेल्या महाबोधी महाविहार संस्थेवर बौद्ध समाजाचे प्रतिनिधित्व असायला पाहिजे. 1949 रोजी तयार करण्यात आलेला बी टी ऍक्ट रद्द करण्यात यावा ,संपूर्ण महाबोधी विहार बुद्धांच्या ताब्यात देण्यात यावे ,यासाठी 12 ऑगस्ट 2024 पासून मोठ्या संख्येत बौद्ध बिहार येथील महाबोधी विहारासमोर आंदोलन बसले होते. मात्र सरकारच्या दुपट्टी धोरणामुळे त्यांना आंदोलन शिथिल करावे लागले. मात्र केंद्र शासनाने व बिहार राज्य सरकार शासनाने यावर लवकरात लवकर तोडगा न काढल्यास 12 फेब्रुवारी 2026 रोजी दिल्ली येथे संसदेसमोर मोठ्या प्रमाणावर संपूर्ण देशातील व भंडारा जिल्ह्यातील उपासक-उपासिकांनी आंदोलनासाठी उपस्थित राहण्याची आव्हान यावेळी त्यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्याकरता महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन संघर्ष समितीचे भंडारा जिल्ह्याचे संयोजक असित बागडे ,युवराज रामटेके ,शशिकांत भोयर, मनोज खोब्रागडे हंसराज वैद्य ,विनय बनसोड ,राजेश मडामे,अचल मेश्राम युवराज रामटेके ,मनोज खोब्रागडे ,सुरेंद्र खोब्रागडे, रोशन जांभुळकर, शरद खोब्रागडे , ज्ञानचंद जांभुळकर ,विनोद रामटेके ,युगांतर बारसागडे ,मुकेश श्याकुवर, सम्यक खोब्रागडे,चांद डोंगरे ,चेतन घोडीचोर,व असंख्य बौद्ध उपासक ,उपासिका व समता सैनिक दलाचे कार्यकर्ते यांनी सहकार्य केले..
0 Response to "भंडारा येथे धम्मध्वज मशाल यात्रेचे आगमन "
एक टिप्पणी भेजें