गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट पक्षाची आढावा बैठक संपन्न
सोमवार, 1 सितंबर 2025
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
गोंदिया :- तिरोडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आढावा बैठक माजी खासदार खुशालचंद्र बोपचे यांच्या अध्यक्षतेखाली व माजी आमदार तथा भंडारा जिल्हा अध्यक्ष
चरणभाऊ वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत 31 ऑगस्ट 2025 ला झरारिया सभागृह, तिरोडा येथे संपन्न झाली.
या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, विधानसभा निवडणुकीतील मतांची चोरी व पुढील काळात मतचोरी रोखण्यासाठी करावयाची कार्यवाही, तसेच स्थानिक प्रश्न आणि पक्ष संघटन बळकट करण्याचे धोरण यावर मार्गदर्शन करत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून पक्षावरील आपली निष्ठा व ताकद दाखवून दिली. पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.
यावेळी सर्वश्री तालुका अध्यक्ष कैलाश पटले, विधानसभा अध्यक्ष ओमप्रकाश रहांगडाले, तालुका कार्याध्यक्ष नासिर घाणीवाला, सामाजिक न्याय तालुका अध्यक्ष युवराज शहारे, महिला तालुका अध्यक्ष भाग्यश्रीताई केळवतकर, शहर कार्यवाह अध्यक्ष आशिष येरपुडे, डॉक्टर सेल अध्यक्ष एम डी पटले, मोहाडी तालुका अध्यक्ष हंसराज आगाशे, शहर कार्याध्यक्ष रजनीकांत शरणागत, भोजराज उईके, उमाशंकर पटले, नंदूभाऊ उके, सर्वश्री सरपंच रवींद्र भगत, छायाताई टेकाम, मंदाताई टेंभरे, उर्मिला पटले, रंजित वालदे, विश्वनाथ बिसेन, कोठीराम निशाणे, आदींसह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Response to "गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट पक्षाची आढावा बैठक संपन्न"
एक टिप्पणी भेजें