दिव्यांगांच्या उन्नतीसाठी तीन लाख कोटींची तरतूद, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची माहित.
शुक्रवार, 19 सितंबर 2025
Comment
• दिव्यांगांसाठी केएमटीची मोफत सेवा.
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्त प्रतिनिधी
कोल्हापूर :- देशातील दिव्यांगांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाने सुमारे ३ लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. भविष्यात दिव्यांगांना सर्वतोपरी सहकार्य केले जाणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.सरकारच्या एडिप योजनेअंतर्गत जिल्ह्यातील नोंदणीकृत दिव्यांगांसाठीच्या मोफत सहायक उपकरण वाटपप्रसंगी ते बोलत होते. स्वामी विवेकानंद कॉलेजच्या शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृती भवन हॉलमध्ये रविवारी कार्यक्रम झाला.मंत्री आठवले म्हणाले, केंद्र सरकारने दिव्यांगासाठी सरकारी नोकरीत चार टक्के आरक्षण ठेवले आहे. पूर्वी सात निकषानुसार दिव्यांगांची व्याख्या ठरवली जायची. सन २०११ च्या जनगणनेनुसार २ कोटी ६८ लाख इतकी दिव्यांगांची नोंद झाली. सरकारने २१ निकषानुसार दिव्यांग शब्दाची व्याख्या ठरवली असल्याने भविष्यात या संख्येत वाढ होईल. खासदार शाहू छत्रपती, खासदार धनंजय महाडिक यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, उपायुक्त पारितोष कंकाळ, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी साधना कांबळे, उत्तम कांबळे, शहाजी कांबळे, कपिल जगताप, सहायक आयुक्त स्वाती दुधाने, कृष्णा पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील आदी उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन यांनी आभार मानले.
0 Response to "दिव्यांगांच्या उन्नतीसाठी तीन लाख कोटींची तरतूद, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची माहित."
एक टिप्पणी भेजें