पर्यावरणपूरक (पीओपी) गणेश मूर्ती विसर्जन व निर्माल्य व्यवस्थापन उपक्रम यशस्वीरीत्या आयोजित..
रविवार, 7 सितंबर 2025
Comment
• रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ इंडस्ट्रियल एरिया यांनी रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ नॉर्थ यांचे मार्गदर्शन
सोनू संजीव क्षेत्रे
"साप्ताहिक जनता की आवाज"
उल्हासनगर :- या उपक्रमाद्वारे POP मूर्तीचे वैज्ञानिक पद्धतीने ७२ ते ८० तासांमध्ये विसर्जन होऊन पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यास मदत झाली. या उपक्रमास अनेक भक्त, नागरिक, रोटरी सदस्य तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
तसेच या प्रसंगी रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ इंडस्ट्रियल एरिया चे अध्यक्ष ॲड. भुषण कोतेकर, सचिव कैलास भिंगरदेवे, प्रकल्पप्रमुख प्रदीप माळी, रोटेरियन अथर्व राणे व रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ नॉर्थ चे प्रकल्प मार्गदर्शक रोटरीयन राजेश भावसार आणि सेंट पॉल्स कॉलेज, उल्हासनगर येथील NSS युनिट यांच्या उपस्तिथीने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या उपक्रमाला जनतेकडून मोठ्या प्रमाणात दाद व प्रशंसा मिळाली असून पर्यावरण संवर्धनासाठी रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ इंडस्ट्रियल एरिया चे हे कार्य एक आदर्श उपक्रम ठरला. समाज आणि निसर्गाच्या भल्यासाठी रोटरी क्लब भविष्यात असेच उपक्रम राबवत राहील.
0 Response to "पर्यावरणपूरक (पीओपी) गणेश मूर्ती विसर्जन व निर्माल्य व्यवस्थापन उपक्रम यशस्वीरीत्या आयोजित.."
एक टिप्पणी भेजें