-->
डॉ.प्रशांत डी चव्हाण यांना राज्यस्तरीय आरोग्य रत्न पुरस्कार प्रदान.

डॉ.प्रशांत डी चव्हाण यांना राज्यस्तरीय आरोग्य रत्न पुरस्कार प्रदान.


संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज"

अहिल्यानगर :- स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय व पै. नाना डोंगरे व्यायाम शाळा निमगांव वाघा, ता.जि. अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने, आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा 2025 दि. 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त निमगाव वाघा येथील परिवार मंगल कार्यालयात संपन्न झाला.

या कार्यक्रमात सोजाई आदिवासी महिला विकास फॉउंडेशन अध्यक्ष तथा संत तुकाराम मल्टी स्पेशलिटी शिवकृपा हॉस्पिटल चे सर्वेसर्वा डायरेक्टर डॉ.प्रशांत डी चव्हाण यांना राज्यस्तरीय आरोग्य रत्न पुरस्कार आज दि.5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

डॉ.प्रशांत चव्हाण यांनी आजपर्यंत वेगवेगळे वृद्धाश्रमांना मदत,गोरगरीब मुले असतील त्यांना शालेय फीच्या स्वरूपात आर्थिक मदत व शालेय साहित्य वाटप, गरजूंना मोफत उपचार असे अनेक वाखान्याजोगे कार्य करून वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. म्हणूनचं डॉ. प्रशांत चव्हाण यांच्या कार्याची दखल घेत त्यांना हा राज्यस्तरीय आरोग्यरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पुरस्कार मिळाल्यानंतर डॉ.प्रशांत यांनी प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले की, मी समाजात अनेक उदाहरणं बघितली आहे.जिथे दात आहे तिथे चणे नाही अशी आजकालची काही परिस्थिती आहे. काहींना दोन वेळचे अन्न पण भेटतं नाही तर ज्या मुलांना खरंच मनापासून शिक्षणाची आवड आहे.परिस्थितीमुळे त्यांना शिकता येत नाही. ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचा आपल्याला काही देणं लागतं. मग ते कुठल्याही स्वरूपात असो त्यामुळे आत्तापर्यंत मी जे काही काम करत आलेलो आहे. ते यापुढेही असंच चालू ठेवणार.असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

शिक्षक दिना निमित्त पहिल्या सत्रात राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा नंतर सर्वासाठी स्नेहभोजन आणि दुसऱ्या सत्रात राज्यस्तरीय तिसरे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन असे कार्यक्रमाचे नियोजन होते.
  
या कार्यक्रमात अँड.राजेश आसाराम कातोरे (अध्यक्ष, अ.नगर बार
असोसिएशन),पल्लवी उंबरहंडे/देशमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक,श्री.राजेंद्र सुंदरदास फंड साहित्यिक व सामाजिक क्षेत्र,गिताराम नरवडे (ज्येष्ठ कवी),आनंदा साळवे (जेष्ठ कवी ),कवी आत्माराम शेवाळे,पत्रकार बाळासाहेब कोठुळे, साहित्यिक कवी रुपचंद शिदोरे,कार्यक्रमाचे आयोजक पै.नानाभाऊ किसन डोंगरे (अध्यक्ष)पै.किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय. आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

या मिळालेल्या पुरस्काराबद्दल महाराष्ट्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतं आहे.

0 Response to "डॉ.प्रशांत डी चव्हाण यांना राज्यस्तरीय आरोग्य रत्न पुरस्कार प्रदान."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article