विद्यार्थ्यांचे परिक्षा व शैक्षणिक शुल्क माफ करा.
बुधवार, 1 अक्टूबर 2025
 Comment 
नरेंद्र मेश्राम 
"सापताहीक जनता की आवाज" 
शरदचंद्र पवार पक्षाच्या विद्यार्थी संघटनेची मागणी
 भंडारा: - संपूर्ण मराठवाड्यात आणि विदर्भात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतातील पीके नष्ट होउन मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. या गंभीर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खुप खालावलेली आहे. त्यांना आपल्या कुटुंबाच्या गरजा भागविणे कठिण झाले आहे. त्यामुळे आपल्या पाल्याचा शैक्षणिक खर्च ते करु शकत नाही. विशेषतः शिक्षणाचा खर्च, परिक्षा शुल्क, शैक्षणिक शुल्क, मासिक भोजनालय खर्च इ. भरणे कठीण झाले आहे.   ह्या परिस्थितीची दखल घेवून ओला दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, मजूर, अल्पभूधारक, भूमीहीन पाल्यांच्या शैक्षणिक शुल्का संदर्भात विविध मागण्या शरदचंद्र पवार पक्षाच्या विद्यार्थी संघटनेने केल्या आहेत. 
*प्रमुख मागणी*
१ *विद्यापीठांतर्गत शिक्षण घेण्या-या अतिवृष्टी भागातील सर्व विद्यार्थ्यांचे सर्व प्रकारचे पुढील वर्षापर्यंतचे परीक्षा शुल्क माफ करण्यात यावे*. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष  *सुनिल गव्हाणे* यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंना तसेच अतिवृष्टी भागातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकारी यांना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी या मागण्यांचे निवेदन देणार आहेत. अशी माहिती *राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भंडारा जिल्हाध्यक्ष राकेश हटवार यांनी दिली*.
0 Response to "विद्यार्थ्यांचे परिक्षा व शैक्षणिक शुल्क माफ करा."
एक टिप्पणी भेजें