-->

Happy Diwali

Happy Diwali
“ काळाची पाऊले ओळखून आंबेडकरी समाजाने संघटित होणे अनिवार्य आहे.” -- प्रा. डॉक्टर सुरेश खोब्रागडे.

“ काळाची पाऊले ओळखून आंबेडकरी समाजाने संघटित होणे अनिवार्य आहे.” -- प्रा. डॉक्टर सुरेश खोब्रागडे.


नरेंद्र मेश्राम 
"सापताहीक जनता की आवाज" 

भंडारा :- स्थानिक सतदम बुद्ध विहार वैशाली नगर येथील विचार मंचावर एम. डब्ल्यू. दहिवले लिखित “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बुद्ध धर्मातील योगदान” या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने प्रा. डॉ. सुरेश खोब्रागडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आज आंबेडकरी समाजाला असंख्य आव्हानांनी वेढले आहे. चळवळीला जगविणाऱ्या आंबेडकरी साहित्याने प्रचंड प्रमाणात आंदोलनाची भूमिका घेऊन समाजाला आकार दिला होता आज वाचन संस्कृतीचा ऱ्हास झाला असून नव्या पिढीला तथागत बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रवर्तक जीवन विचार मानवी उन्नतेसाठी आवश्यक आहे पण याच वेळेस चळवळी भरकटलेल्या असताना आज थोरांचे ग्रंथच आपल्याला वाचवू शकतात. समाज पेशवाई येण्याची वाट पाहत असल्याचे भयानक द्रुश्य दिसत असून समाजाला सजग राहण्याची गरज आहे. वयाच्या 85 व्या वर्षी एम. डब्ल्यू. दहिवले यांनी आपल्या पाचव्या पुस्तकाला प्रकाशित करून , जनमाणसासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे, असे विचार प्रा.डॉ. सुरेश खोब्रागडे प्रसिद्ध कवी, समीक्षक तथा नाटककार  यांनी व्यक्त केले आहे

पुस्तक प्रकाशन सोहळ्याला प्रमुख उपस्थितीत कवी तथा प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते अमृत बन्सोड यांनी वरील पुस्तकाला प्रस्तावना लिहिली असून या प्रस्तावनेच्या अनुषंगाने आपले मनोगत व्यक्त केले. तसेच समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब  कोचे यांनी देखील आंबेडकरी चळवळीच्या दृष्टिकोनातून समयोचित विचार व्यक्त केले. शेवटी प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती भंडाराचे अध्यक्ष महादेवराव मेश्राम यांनी देखील आंबेडकरी विचारांनी बुद्धांचा धम्म कसा पुढे गेला यावर भाष्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुस्तकाचे लेखक एम. डब्ल्यू. दहिवले यांनी केले तर सूत्र संचालन प्रा. रमेश जांगळे व आभार प्रा. मोरेश्वर गेडाम यांनी मानले कार्यक्रम यशस्वीकरिता पदम रामटेके, अरविंद कानेकर, श्रीराम बोरकर, तीर्थराज सोनटक्के, मोरेश्वर गेडाम, बी. टी. रामटेके, राजकुमार बागडे, रमेश जांगळे, सुदेश दहिवले यांनी परिश्रम घेतले. 
                            
                                                                                                            

0 Response to "“ काळाची पाऊले ओळखून आंबेडकरी समाजाने संघटित होणे अनिवार्य आहे.” -- प्रा. डॉक्टर सुरेश खोब्रागडे."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article