भंडारा जिल्हा सरसकट ओला दुष्काळ जाहीर कराव आणि लवकरात लवकर आर्थिक मदत द्यावी.
बुधवार, 1 अक्टूबर 2025
Comment
• मागणी साठी तहसील कार्यालय लाखनी मार्फत मा. मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्याकरीता.केली विनंती.
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा: - जिल्ह्यात व राज्यात काही दिवसापासून सतत पावसाचा जोर कायम असून आणि हवामान विभागाने पुढील काही दिवस पुन्हा पाऊसाचा इशारा दिला आहे त्यामुळे हलक्या वाणाचे धान,कापूस, सोयाबीन, भाजीपाला वर्गीय पिके जमीनदोस्त झाले आहेत आणि आता मध्यम वाणाचे धान कापणीस आले आले आहेत आणि रोज पाऊसाचा धुमाकूळ आहे.
शेतकऱ्यावर एकीकडे आर्थिक संकट आहेच आणि आता निसर्गाचा लहरीपणा त्यामुळे दुहेरी कोंडी निर्माण झालेली आहे..
या गंभीर परिस्थितीत शासनाने तातडीने पुढील उपाययोजना कराव्यात,भंडारा जिल्हा सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा आणि नुकसान भरपाई द्यावी व संपूर्ण कर्जमाफी करावी ह्या मागणी साठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार तर्फे निवेदन देण्याकरीता दि. ३/०९/२०२५ ला सकाळी ११.३० वाजता तहसील कार्यालय लाखनी. येथे सहभागी व्हावे असे अमोलजी घुले तालुका अध्यक्ष,लाखनी व युवा जिल्हाध्यक्ष .श्री नरेंद्र मारवाडे यांनी विनंती केली आहे.
0 Response to "भंडारा जिल्हा सरसकट ओला दुष्काळ जाहीर कराव आणि लवकरात लवकर आर्थिक मदत द्यावी."
एक टिप्पणी भेजें