-->
पवनी न्यायालयाचा निर्वाळा   अष्छिल शिवीगाळ, धमकी व मारपीट प्रकरणात 3 आरोपी यांना प्रत्येकी 1000 रुपये द्रव्यदंडाची शिक्षा

पवनी न्यायालयाचा निर्वाळा अष्छिल शिवीगाळ, धमकी व मारपीट प्रकरणात 3 आरोपी यांना प्रत्येकी 1000 रुपये द्रव्यदंडाची शिक्षा

 "साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्त प्रतिनिधी.
भंडारा :- जिल्ह्यातील पोलीस स्टेशन अड्याळ हद्दीतील ग्राम कोसरा येथील फिर्यादी नामे योगिता हेमंत माकडे वय 30 वर्षे राहणार कोसरा यांनी दिनांक 1 ऑक्टोंबर 2017 रोजी घराचे अंगणाचे वादावरून झगडा भांडण तसेच अश्छिल भाषेत शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मार्केट केली व जीवे मारण्याची धमकी दिली याबाबत आरोपी नामे प्रणित वसंता माकडे वय 29 वर्षे, अमोल वसंता माकडे वय 18 वर्षे , सत्यशोभा
 वसंता माकडे वय 46 वर्षे राहणार कोसरा ,यांच्याविरुद्ध तक्रार दिल्याने पोलीस स्टेशन अड्याळ येथे अपराध क्रमांक 181/ 2017 कलम 294 ,323 ,504 ,506 ,34 भादवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला .सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार विकास जाधव बक्कल नंबर. 758 यांनी करून आरोपी विरुद्ध पुरावे गोळा करून  दोषारोप पत्र पवनी न्यायालयात दाखल केले. पुराव्यावरून पवनी न्यायालयाचे न्यायाधीश श्री ए व्हि पंडित यांनी कलम 248,( 2) सी आर पी सी अन्वये दिनांक 27 नोवेंबर 2025 रोजी तिन्ही आरोपी यांना प्रत्येकी 1000 हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा ठोकवली. सरकारी पक्षाकडून सहाय्यक सरकारी अभियोगता कुमारी पुनम बी नवनागे यांनी बाजू मांडली .तर पोलीस शिपाई नितीन मेश्राम बक्कल नंबर 1580 यांनी कोर्ट पैरवी केली .

0 Response to "पवनी न्यायालयाचा निर्वाळा अष्छिल शिवीगाळ, धमकी व मारपीट प्रकरणात 3 आरोपी यांना प्रत्येकी 1000 रुपये द्रव्यदंडाची शिक्षा "

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article