महापालिकेत “पंडीत जवाहरलाल नेहरु’’ यांना अभिवादन
शनिवार, 15 नवंबर 2025
Comment
विजय चौडेकर
"साप्ताहिक जनता की आवाज"
नांदेड :- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिके तर्फे आज दि.१४ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता मुख्य प्रशासकीय इमारत स्थायी सभागृह कक्ष पहिला माळा येथे पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम,अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार,उपायुक्त नितीन गाढवे,उपायुक्त स.अजितपालसिंग संधु, उपायुक्त अभिजीत वायकोस, स्विय सहाय्यक महेश आसने,आनंदा खानसोळे, शुभांगी चौधरी, श्रुती देशपांडे यांच्यासह मनपाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थिती होते.
0 Response to "महापालिकेत “पंडीत जवाहरलाल नेहरु’’ यांना अभिवादन"
एक टिप्पणी भेजें