-->
रेल्वे स्टेशन परिसर व वजिराबाद भागातील अतिक्रमण धारकांवर महानगरपालिका व पोलीस विभागाची संयुक्त करवाई

रेल्वे स्टेशन परिसर व वजिराबाद भागातील अतिक्रमण धारकांवर महानगरपालिका व पोलीस विभागाची संयुक्त करवाई


• १५ अतिक्रमण धारकांवर जेसीबीच्या सहाय्याने कारवाई

विजय चौडेकर 
"साप्ताहिक जनता की आवाज"   

नांदेड :- शहरातील वाढत्या अतिक्रमणावर आळा घालण्यासाठी व वाहतुकीची समस्या सोडविण्याच्या दृष्टीकोणातुन शहरातील रेल्वे स्टेशन परिसर व वजिराबाद या भागातील रस्याच्या दुतर्फा असणाऱ्या अतिक्रमण धारकांवर महानगरपालिकेने कारवाईचा बडगा उगारला असुन दिनांक १०.११.२०२५ रोजी महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने *रेल्वे स्टेशन परिसर वजिराबाद मुख्य बाजारपेठ* येथील रस्त्याच्या दोन्ही बाजुने झालेले अतिक्रमण काढले. या कारवाईत जेसीबीच्या सहाय्याने १५ अतिक्रमण धारकांवर कारवाई करून माल जप्त करण्यात आला आहे.

सदरील कारवाई *मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे, पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार व अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम* यांच्या मार्गदर्शनाखाली *उपआयुक्त स. अजितपालसिंघ संधु* यांच्या नेतृत्वात अतिक्रमण विभाग व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई पार पाडली. रेल्वे स्टेशन परिसर वजीराबाद मुख्य बाजारपेठ येथील रस्त्यावरील रहदारीस व पदचाऱ्यास अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमण धारकांवर कारवाई करून रस्ता अतिक्रमण-मुक्त करण्याच्या हेतुने ही कारवाई करण्यात आली असुन या कारवाईत *वजिराबाद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री पवार व त्यांचे पोलीस सहकारी* अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त रावण सोनसळे, क्षेत्रिय अधिकारी गौतम कवडे, अतिक्रमण पथक प्रमुख विशाल सोनकांबळे, अनिल चौदंते यांच्यासह महापालिकेचे २० कर्मचारी तसेच पोलीस विभागातील १० कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. एकंदरीत मनपा व पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यमाने ही जंबो कार्यवाही करुन रस्त्यावरील अतिक्रमण काढुन टाकण्यात आले आहे.

महानगरपालिका हद्दीत मुख्य रस्त्यावर व्यापाऱ्यांनी व नागरीकांनी कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण न करता रहदारीस अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात येत आहे. शहरातील मुख्य रस्ते अथवा इतरत्र अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधीतावर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा महापालिका प्रशासना तर्फे देण्यात येत असुन यापुढे सुध्दा महानगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने शहरातील अतिक्रमण धारकांवर कारवाई करण्याची मोहिम सुरुच राहील असे यावेळी महापालिका प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले.

0 Response to "रेल्वे स्टेशन परिसर व वजिराबाद भागातील अतिक्रमण धारकांवर महानगरपालिका व पोलीस विभागाची संयुक्त करवाई"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article