इव्होनिथ व्हॅल्यू अँड स्टील वर्धा कंपनीत समर्थ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची निवड सत्कार समारंभ उत्साहात संपन्न.
शुक्रवार, 14 नवंबर 2025
Comment
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
लाखनी :- राष्ट्रीय शिक्षण संस्था, लाखनी अंतर्गत समर्थ महाविद्यालय, लाखनी येथे प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या इव्होनिथ व्हॅल्यू अँड स्टील वर्धा कंपनीच्या भरती प्रक्रियेत महाविद्यालयातील बी.एस्सी. तृतीय वर्ष उत्तीर्ण विद्यार्थ्यांची निवड झाली. दिनांक 1 नोव्हेंबर 2025 रोजी कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांच्या मुलाखती व लेखी परीक्षा घेण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत यश संपादन केले. या निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ महाविद्यालयाच्या भगिनी निवेदिता सभागृहात उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष आल्हाद लाखनीकर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिगांबर कापसे होते. प्रमुख अतिथी म्हणून आय.सी.आर. पुणे येथील शास्त्रज्ञ डॉ. किरण भगत, रवींद्र कापसे, प्लेसमेंट सेल प्रमुख डॉ. धनंजय गभने, तसेच श्यामराव पंचवटे हे मान्यवर उपस्थित होते. वक्त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. रोजगाराच्या संधी मिळविण्यासाठी आत्मविश्वास, कौशल्यविकास आणि सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रसंगी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. त्यामध्ये रक्षा चाचेरे, भाग्यश्री सार्वे, स्मिता निखाडे, अमिषा सावरकर, काजल मुटकुरे, प्राची पटले, सेजल भोयर, विनय रोकडे, गायत्री निखाडे, काजल कुंभरे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
समर्थ महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना रोजगाराच्या दिशेने नवी वाट उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन प्रा. शीतल कोमेजवार यांनी कुशलतेने केले, तर आभार प्रदर्शन प्रा. पूजा नवखरे यांनी मानले.
0 Response to "इव्होनिथ व्हॅल्यू अँड स्टील वर्धा कंपनीत समर्थ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची निवड सत्कार समारंभ उत्साहात संपन्न."
एक टिप्पणी भेजें