-->
जिल्ह्यात धान खरेदीची नोंदणी व मोजणी प्रतीक्षेतचं!.

जिल्ह्यात धान खरेदीची नोंदणी व मोजणी प्रतीक्षेतचं!.

• जिल्हाधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज 

• खासगीत ५६९ ₹ ची प्रति क्विंटल नुकसान.
 
 नरेंद्र मेश्राम 
"साप्ताहिक जनता की आवाज"

पालांदूर :- धानउत्पादक शेतकऱ्यांचा सातबारा  नोंदणी व मोजणी  अजूनही प्रतीक्षेतच आहे. शासनाच्या दिरंगाई धोरणामुळे प्रशासनातील अधिकाऱ्यांवर शेतकऱ्यांच्या मागणीचा बोजा रोज वाढत आहे. नोंदणी व खरेदी नोव्हेंबर अर्ध्यात येऊनही प्रतीक्षेतच आहे. धान खरेदी समितीचे अध्यक्ष या नात्याने जिल्हाधिकारी यांनी नोंदणी सुरू करून खरेदीचा सुद्धा श्रीगणेशा करावा.

कृषीप्रधान देश म्हणून सन्मानाने सर्वजण गौरवितात. मात्र शेतकऱ्यांचा अजूनही सर्वांगीण विकासाकरिता नियोजित असलेल्या धोरणांचा उपयोग प्रत्यक्षात होताना दिसत नाही. दसऱ्याच्या मुहूर्तावर धान  खरेदी सुरू होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. परंतु तब्बल ४०  दिवसाचा कालावधी लोटून सुद्धा धान खरेदी सुरू झालेली नाही.

आधारभूत केंद्रात रोजच विचारणा...
धानाची मळणी करून धान विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत. हजारो क्विंटल धान शेतकऱ्यांच्या शेतात, गोठ्यात तर प्रसंगी उघड्यावर ताडपत्रीचे आधाराने विक्री करिता प्रतीक्षेत आहेत. आज होईल उद्या होईल या आशेने शेतकरी रोजच आधारभूत केंद्रात नोंदणी करिता विचारणा करीत आहे. जिथे नोंदणीच सुरू झाली नाही, तर मोजणी केव्हा होणार? या प्रश्नाच्या भडीमाराने आधारभूत केंद्रधारक सुद्धा संकटात आले आहेत.

पालकमंत्र्यासह लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष...
दसऱ्यापासून जिल्ह्यात धानमळणीचा मुहूर्त साधला गेला आहे. वास्तविकता धान उत्पादक जिल्ह्यातीलच मुख्यमंत्री महोदय असल्याने तत्परतेने धानउत्पादक जिल्ह्यांना न्याय देणे अपेक्षित आहे. मुख्यमंत्री महोदयांच्या अगदी निकटचे लोकप्रतिनिधी सुद्धा जिल्ह्यातीलच आहेत. पालकमंत्री महोदय सुद्धा धानउत्पादकांच्या व्यथांचे अभ्यासू आहेत. एवढे असताना सुद्धा भंडारा जिल्ह्याचा धानाचा कोठार म्हणून असलेला सन्मान टिकेचा धनी होत आहे. धानउत्पादक शेतकरी शासनाच्या चुकीच्या धोरणाने नागवला जात आहे.


कोट: वरिष्ठ स्तरावरून उद्या नोंदणीच्या अनुषंगाने महत्त्वाचे असलेले नवीन यंत्र येत आहे. ती मशीन (यंत्र) मिळताच जिल्ह्यात नोंदणीचा शुभारंभ करता येईल. त्यानंतर आधारभूत केंद्रांना खरेदीचे प्रस्ताव मागवून लवकरच खरेदी सुद्धा सुरू केली जाईल. 
 एस बी चंद्रे 
जिल्हा पणन अधिकारी भंडारा

0 Response to "जिल्ह्यात धान खरेदीची नोंदणी व मोजणी प्रतीक्षेतचं!."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article