-->
तुमसरात सातव्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी ५ उमेदवारांचे अर्ज दाखल

तुमसरात सातव्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी ५ उमेदवारांचे अर्ज दाखल

• नगरसेवक पदासाठी 97 उमेदवारांचे नामांकन.

"साप्ताहिक जनता की आवाज"
 वृत्तपत्र प्रतिनिधी.
 
तुमसर :- नगर परिषद
निवडणुकीच्या रणसंग्रामात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ एक दिवस शिल्लक असतांना सातव्या दिवशी तुमसर नगर परिषद निवडणुकीच्या रिंगणात नगराध्यक्ष पदांसाठी उमेदवारांनी दि. १६ नोव्हेंबर रोजी आपले नामांकन अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केले आहे. तर नगरसेवक पदांसाठी ९७ उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले आहे.

दि. २ डिसेंबर ला होऊ

घातलेल्या नगर निवडणुकीचे हिवाळ्याच्या थंडीत आता परिषद वातावरण अधिकच तापायला लागले आहे. सर्वच राजकीय पक्षात नगराध्यक्ष पदाच्या तिकीट वाटपावरुन राजकीय खलबत्ते सुरु आहे. तुमसरात सध्या शिवसेना (शिंदे) पक्ष वगळता अन्य कुठल्याही राजकीय पक्षाने अधिकृत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर केले नाही. परिणामी न.प. निवडणुकीत नगराध्यक्ष पदांसाठी उभे ठाकणाऱ्या उमेदवारांत आता अधिकच धाकधुक वाढली आहे

0 Response to "तुमसरात सातव्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी ५ उमेदवारांचे अर्ज दाखल"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article