बांधकाम विभाग कार्यालयात नांदेड, अधिकारी ना कर्मचारी दालनात शुकशुकाट, विचारणार कोण?
शनिवार, 22 नवंबर 2025
Comment
विजय चौडेकर
"साप्ताहिक जनता की आवाज"
नांदेड :- बांधकाम विभाग हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे,जिथे बरेच काम होत असल्याने लोकांची रेलचेल असते आणि जर अधिकारी ना कर्मचारी आलेच नाही तर कामे कशी होणार कार्यालय खुल्ल मोकळं करून ठेवल वेळ ११-३०, मिनिटं जर या वेळेत अधिकारी येत नाहीत म्हणजे याचा अर्थ यांना विचारणार कोण आहे, केव्हाही यायचं केव्हाही जायचं पगार शासणाचा फुकट लाटायचा गोर गरीब जनता कार्यालयात खेटे मारुन बेजार होणार एक तर त्यांच काम बुडणार,चकरा मारण्यात पैसा जाणार जरी एखादा अधिकारी हजर असला तरी तो दहा चकरा मारू घालणार लवकर काम करणारं नाही या मुजोर कर्मचारी अधिकारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई का करू नये हे लोक शासनाचे नौकर,जनतेचे नौकर, मग हे लोक स्वतःला समजतात काय असा प्रसंग बर्याच कार्यालयात दिसून येतो परंतु आवाज कोण उचलणार जर शासनाने प्रत्येक शासकीय कार्यालयाची चौकशी केली तर बर्याच ठिकाणी असे आढळून येईल परंतु वरिष्ठ अधिकारी लोकांना वेळच नसतो,या कामचोर अधिकाऱ्यांमुळे जनतेची हेळसांड होत आहे,तरी तहसीलदार, निवासी उपजिल्हाधिकारी,व जिल्हाधिकारी यांनी लक्ष देण गरजेच आहे, आणि अशा लोकांवर शिस्त भंगाची कारवाई का होऊ नये,
0 Response to "बांधकाम विभाग कार्यालयात नांदेड, अधिकारी ना कर्मचारी दालनात शुकशुकाट, विचारणार कोण?"
एक टिप्पणी भेजें