-->
दोन एकरातील धानाचे पूजने जळून खाक!.

दोन एकरातील धानाचे पूजने जळून खाक!.


• खवाकल येथील घटना, ७० हजार चे नुकसान

"साप्ताहिक जनता की आवाज" 
वुत्तपत्र प्रतिनिधी

लाखनी :- तालुक्यातील शेवटच्या टोकातील वाकल येथील सूर्यभान साखरे यांच्या शेतात धानाच्या गंजीला आग लागण्याने मोठी हानी झाली. यात शेतकऱ्याचे दोन एकरातील किमान ७० हजार रुपये किमतीचे केसर जातीचे धान जळाले. ही घटना शनिवारी चार वाजेच्या सुमारास घडली. दुर्योधन कोचे राहणार वाकल असे नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे. 

वाकल येथील बुद्ध विहाराच्या मागे धानाची गंजी मळणीच्या प्रतीक्षेत ठेवली होती. गंजीच्या वर विद्युत तार गेले आहेत. त्यामुळे प्राथमिक अंदाजात शॉर्टसर्किटने वीज लागल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. गावा लगत असल्याने गावकऱ्यांनी एकच धाव घेत पाण्याचा मारा करीत आज ऑटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. दुर्योधन कोचे हा अल्पभूधारक शेतकरी आहे. त्याने गावातीलच सूर्यभान मेश्राम यांची शेती भाडे तत्त्वावर केली आहे. अंतिम टोकात गंजी जळल्याने दुर्योधन कोचे आर्थिक संकटात सापडला आहे. तलाठी कासराळे यांच्याशी भ्रमणध्वनी वरून बोलणं करून पंचनामा करणार असल्याचा शब्द दिला. आगीचे नेमके कारण कळू शकले नाही. 


0 Response to "दोन एकरातील धानाचे पूजने जळून खाक!."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article