पालांदुर परिसरात मानवी जिवितहानीचा धोका बळावला.
सोमवार, 17 नवंबर 2025
Comment
• पालांदूर 30 किमी पर्यंत बिबट्या आणि वाघाचा थरार:गावकरी भयभीत
• गस्तिदर्म्यान वनविभाग चमूला अपयश : जनसामान्यांना उडवा उडवीचे उत्तर.
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
पालांदूर :- बुधवारी रात्री पालांदूर खराशी भागात
रस्त्याच्या कडेला गावकऱ्यांना बिबट्याची झलक दिसल्याने सर्वत्र बोलले जात होते त्यातच किटाडीत ही वाघाचे आठवड्यापासून अस्तित्व असल्याने नागरिकांमध्ये भीती संचारली आहे.ये जा करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करण्यास भाग पडते असे वास्तव समोर येत आहे त्यामुळे जीवित हानी झाली तर याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे ?त्यामुळे जनसामान्यांच्या हिताचे समाधानकारक पाऊल घेण्याची गरज आहे.
वनविभागाचे अपयश
बिबट्याने केली
बकऱ्याची शिकार!.
आरआरटी भंडारा व क्षेत्र सहायक किटाडी यांची टीम गस्तीवर असले तरीही लोहारा येथे शुक्रवारला सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास लोहारा/ पाथरी शिवारात बिबट्याने बकऱ्याची शिकार केली. तेजस फुंडे (लोहारा) असे नुकसानग्रस्त पशुपालकाचे नाव आहे त्यामुळे संबंधित विभाग अपयशी ठरला असे मत व्यक्त केले जातआहे.घटनास्थळावर माहिती मिळताच बीटरक्षक एन.कळंबेनी भेट देऊन पंचनामा केला.
थरार वाघाचा अन् बिबट्याचा
भयभीत जनता आणि वाघ,बिबट्याचा लपंडाव खेडीत पालांदूर किटाडी खरासी परिसरात गत महिनाभरापासून अस्तित्व कायम ठेऊन आहे यात मागील पंधरवड्यात भास्कर झलके यांच्या घरासमोर खराशी येथे बिबट्या जेरबंद प्रयत्न ही अपयशी ठरले. शेतशिवारात दिवसाला तर रात्री गावाच्या शेजारी बिबट्याची हजेरी गावकऱ्यांना भीती दाखवीत आहे.अनेकांना बिबट्याचे दर्शन झाले असून वन विभागाचे कर्मचारी गस्त घालत आहेत . किताडी क्षेत्रात ड्रोन च्या माध्यमातून शोध घेतला जात आहे मात्र अजून लोकेशन मिळालेले नाही यात बीटरक्षक शहारे मॅडम, देशमुख मॅडम शोध घेत आहेत त्यामुळे कोणतेही घटना घडल्यास त्वरित वन विभागाला माहिती द्यावी असे शामकुवर यांनी स्पष्ट केले आहे.
``वनपरिक्षेत्राधिकारी मुकेश महाजन यांच्या सूचनेनुसार क्षेत्र सहायक मुकेश श्यामकुवर, बीटरक्षक नीलेश कळंबे देवरी (पालांदूर), ज्ञानेश्वर बुरडे रेगोळा व आरटीटी भंडारा यांनी गस्त घातली मात्र अजून पर्यंत यश आले नसून गस्त सुरू आहे."
*लवकरच तोडगा काढण्यासाठी सक्रिय*
''गुरवारी लोहारा येथिल घटने नंतर रात्री सुमारास पालांदुर येथे बिबट्याचे लोकेशन असल्याचे समजले होते .
नागरिकांनी वन्यप्राण्यांची भीती मनात ठेवू नये असे म्हणणे चुकीचे ठरेल मात्र वन विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन नक्कीच करावे"
मुकेश श्यामकुवर, क्षेत्र सहायक,
किटाडी.
*पंकज घाटबांधे उपसरपंच किटाडी*
बिबट्या व वाघाचा वनविभागाने बंदोबस्त करावा सर्वत्र जनतेची मागणी आहे वरिष्ठ अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे मत त्यांनी मांडले तर जेरबंद करून वन प्रकल्पात त्यांना सोडावे अन्यथा मानवी जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे गुरुवारला ग्रामपंचायत कार्यालय किटाडी येथे वनक्षेत्राधिकारी महाजन व गावकऱ्यांची बैठक नियोजित केली होती मात्र ते अनुपस्थित राहिले त्यामुळे ग्रामस्थ जनता तापली होती त्यामुळे बैठक पुढे ढकलण्यात आली आहे सध्या दिवसरात्र गस्त घालत असल्याचे दिसून येत होते मात्र किटाडी येथे आयोजित मीटिंगला अधिकाऱ्याची पाठ फिरवली फिरवल्याने गावकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
0 Response to "पालांदुर परिसरात मानवी जिवितहानीचा धोका बळावला."
एक टिप्पणी भेजें