-->
पर्यटन स्थळ रावनवाडी(जला.) येथे कोदावशय यात्रेनिमित्त

पर्यटन स्थळ रावनवाडी(जला.) येथे कोदावशय यात्रेनिमित्त


• डॉ.अक्षय कहालकर यांचे हस्ते वडसा संच नाटकाचे उद्घाटन.
 
"साप्ताहिक जनता की आवाज" 
वुत्तपत्र प्रतिनिधी 

भंडारा :- जिल्ह्यातील पहेला परिसरातील निसर्गरम्य वातावरण लाभलेल्या पर्यटन स्थळ म्हणून उदयास आलेल्या रावनवाडी येथे दि. 20 नोव्हेंबर ला मोफत नाटकाचे आयोजन करण्यात आले असून नाटकाचे उद्घाटन डॉ.अक्षय कहालकर यांचे हस्ते करण्यात आले.

पर्यटन स्थळ रावनवाडी(जलाशय) येथे अनेक वर्षांपासून कोदावश यात्रेनिमित्त मोफत तीन अंकी नाटकाचे आयोजन करण्यात येते. ह्यावर्षी नाटकाचे नाव "तुच माझी सौभाग्यवती". सामाजिक, सांस्कृतिक व कौटुंबिक विषयांवर झाडीपट्टी वडसा कलाकारांतर्फे अतिशय रोचक नाटकाचे संचलन करण्यात येत असते. अंबामाता देवस्थान कमिटी तर्फे व गावकऱ्यांच्या पुढाकारातून दरवर्षीच आयोजन करण्यात येते. परिसरातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित असतात तसेच यात्रेनिमित्त परंपरागत जेवणाची रेलचेल असते.

कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ.अक्षय कहालकर, भंडारा जिल्हा परिषद अध्यक्षा कविताताई उईके, अध्यक्ष दयानंदजी नखाते, निलकंठजी कायते, पंचायत समिती सदस्या समिताताई रामटेके,नरेंद्रभाऊ रामटेके, काजल चवळे, सरपंचा ओमकांता पंधरे, शालिकजी लुटे ग्रामसेवक, रूपेशजी जिभकाटे तसेच ग्रामपंचायत सदस्य प्रमुख पाहुणे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन अंबामाता देवस्थान कमिटीचे अध्यक्ष अविनाश उईके, यादोराव कुथे, कवडूजी फेंडर, जगदीशजी उईके, लोकेश भोंगाडे व गावकरी यांनी केले असून कार्यक्रमाचे संचालन रूपेश फेंडर तर आभार प्रदर्शन यादोरावजी कुथे यांनी मानले.

0 Response to "पर्यटन स्थळ रावनवाडी(जला.) येथे कोदावशय यात्रेनिमित्त "

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article