संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालय, सालेभाटा येथे संस्कार शाळा शिबिर उत्साहात संपन्न.
शनिवार, 22 नवंबर 2025
Comment
• दिव्य ज्योती संस्थेचा उपक्रम
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
लाखनी :- तालुक्यातील संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालय, सालेभाटा येथे दिनांक 19 नोव्हेंबर 2025 रोजी दिव्य ज्योती संस्थेच्या वतीने संस्कार शाळा शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक सदासन चौधरी, सरिता दीदी, संध्या राऊत, कल्पना रहांगडाले, अनिता पटले, सुधा बोपचे, सीमा पटले उपस्थित होते.
शिबिरामध्ये दिव्य ज्योती संस्थेतर्फे विद्यार्थ्यांसाठी विविध सर्जनशील आणि मूल्याधिष्ठित उपक्रम घेण्यात आले. या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आनंददायी शिक्षणाचा मनसोक्त आनंद लुटला.
संस्कार, नैतिक मूल्ये, व्यक्तिमत्त्व विकास आणि सकारात्मक विचारसरणी यांचा समावेश असलेल्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
कार्यक्रमाला विद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षकवर्ग तसेच दिव्य ज्योती संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्याने शिबिर यशस्वीपणे पार पडले.
0 Response to "संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालय, सालेभाटा येथे संस्कार शाळा शिबिर उत्साहात संपन्न."
एक टिप्पणी भेजें