"या" स्टँम्प पेपरवरील "करारनामा शपथपत्र" ने उडविली उमेदवारांची झोप
शुक्रवार, 21 नवंबर 2025
Comment
प्रत्येक जनतेत हा करारनामा झाला १००% सत्य लिखीत ; सोशल मिडीयाची भ्रष्टांविरोधात जनजागृती ; अनेक शहरांमध्ये झाला करारनामा व्हॉयरल.
नरेंद्र मेश्राम
"सप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- आजपर्यंत इतिहासात असा बेधडकपणे जनतेच्या हितासाठी व भ्रष्टाचार विरोधी करारनामा कुणी कदाचितच केला नसेल. पण भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे चक्क स्टँम्प पेपरवर नगराध्यक्ष व नगरसेवक यांसाठी जनतेकडून शपथपत्र करारनामा लिहून घेण्याची मोहीम सुरू झाली आहे. व या भ्रष्टांविरोधात मोहिमेवर अनेक उमेदवारांची जणू झोपच उडाली आहे. तर या शपथपत्र करारनाम्याला समस्त जनतेने अगदी १००% टक्के बरोबर असल्याची पसंती दर्शविली आहे हे विशेष.
सध्या नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीचे वारे सुरू आहेत. सर्वच उमेदवारांनी भावी नगरसेवक व नगराध्यक्ष असा प्रचार सुरू केला आहे. पण खरंच कुणाच्या मनात काय चालले आहे, तो खरंच विकास करेल की नाही की, निवडून आल्यानंतर निव्वळ ठेकेदारी करीत कमिशन घेण्याचा व्यवसाय करेल. यासाठी साकोली सोशल मिडीयातून जनतेमध्ये जनजागृती करीत असा स्टँम्प पेपरवर शपथपत्र करारनामा बनविला की, त्याला काही तोडच नाही. म्हणजेच या शपथपत्र करारनाम्यावर जो बिनधास्तपणे स्वाक्षरी करेल तो खरा विकास करणारा सिद्ध होणार आहे. आणि जो स्वाक्षरी करायला घाबरेल तर त्याच्या मनात काही तरी सुडबुद्धीची व निव्वळ अफरातफर करण्याचे षडयंत्र सुरू आहे असे सिद्ध होईल. सध्या हा साकोली येथून बनलेला करारनामा नागपूर, पुणे, नाशिकसह अनेक शहरांमध्ये प्रसिद्ध होत आहे. या शपथपत्र करारनाम्याला समस्त जनतेनी अगदी बरोबर आणि १००% टक्के सत्य करारनामा असल्याची प्रतिक्रिया सुरू आहे. कारण यात स्टँम्प पेपर खरेदीसाठी जनताच वर्गणीतून पैसे गोळा करीत असून प्रत्येक प्रभागातील प्रत्येक नगरसेवक उमेदवारांकडून जनता लिहून घेणार आहे. आणि ज्या शपथपत्र करारनामा वर स्वाक्षरी केली आहे ते ते निवडून आले आणि त्यांनी थोडेही गैरव्यवहार, भ्रष्टाचार, कमिशनखोरी आढळून आली तर यामध्ये थेट भारतीय राजमुद्रेचा अपमान प्रकरणी व त्या स्टँम्प पेपरवर लिखाणाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांवर गुन्हाही दाखल करण्याचे प्रावधान आहे. सध्या हा शपथपत्र करारनामा चांगलाच व्हायरल झाला असून ज्यांच्या मनात खादाड वृत्तीची भावना असणा-या उमेदवारांना या स्टँम्प पेपरची चांगलीच धडकी भरली असून त्यांची झोप मात्र जनतेच्या सोशल मिडीयाने उडविली आहे.
0 Response to ""या" स्टँम्प पेपरवरील "करारनामा शपथपत्र" ने उडविली उमेदवारांची झोप "
एक टिप्पणी भेजें