तुमसरात तीन उमेदवारांची माघार
शुक्रवार, 21 नवंबर 2025
Comment
उमेदवारी अर्ज मागे घेण्याकडे नजरा.
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी
भंडारा :- भंडारा जिल्ह्यातील भंडारा, तुमसर, पवनी व साकोली-सेंदूरवाफा नगरपरिषद निवडणुकीकरीता २ डिसेंबर रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीकरीता अध्यक्ष व सदस्य पदांकरीता उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. २१ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेतले जाणार आहे. २० नोव्हेंबर रोजी तुमसर न. प. निवडणुकीतील आम आदमी " पार्टीच्या उमेदवाराने अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतली तर सदस्य पदाच्या दोन अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. २१ नोव्हेंबर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस असल्याने याकडे जनतेच्या नजरा
लागलेल्या आहेत.
तुमसर निवडणुकीतून नगराध्यक्ष पदाचे आम आदमी पार्टीचे मनोज दिलीप गुप्ता,अपक्ष उमेदवार सुनील लाजेंवार,व शैलेश पडोळे या उमेदवाराने नामांकन मागे घेतले. तर प्रभाग ३ (अ) मधील अनु. जाती प्रवर्गातील अपक्ष उमेदवार शालीक इंदल भोंडेकर व प्रभाग १२ (ब) मधील सर्वसाधारण प्रवर्गातील अपक्ष .उमेदवार प्रभाकर गणपतराव सिंगणजुळे, पदासाठी पाच उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली. उमेदवार प्रभाकर
चारही जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून सत्ताधाऱ्यांपुढे सत्ता
नवनवीन कायम ठेवण्याचे तर विरोधकांपुढे सत्ता काबीज करण्याचे कडवे आव्हान आहे. यासाठी पुढाऱ्यांसह उमेदवारांकडून समीकरणे तयार करून डावपेच आखत आहेत. या निवडणुकीत बंडखोरांचे मोठे आव्हान पक्षाच्या उमेदारांपुढे आहे. याकरीता बंडखोर उमेदवारांची उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मनधरणी करीत आहेत.
दि.२१ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांनी प्रचाराला सुरूवात केली असून कार्यकर्त्यांसह मतदारांपर्यंत पोहचत आहेत. जिल्हा थंडीने गारठला असताना निवडणुकीच्या गरम वाऱ्याने मात्र वातावरण तापत आहे.
0 Response to "तुमसरात तीन उमेदवारांची माघार"
एक टिप्पणी भेजें