-->
तालुका विधी सेवा समितीकडून विद्यार्थ्यांना कायदेशीर मार्गदर्शन.

तालुका विधी सेवा समितीकडून विद्यार्थ्यांना कायदेशीर मार्गदर्शन.


लाखनी विधी सेवा समितीकडून POCSO, सायबर क्राईमवर प्रबोधन. 

"साप्ताहिक जनता की आवाज"
 वुत्तपत्र प्रतिनिधी 

लाखनी :- तालुका विधी सेवा समितीच्या वतीने मनोहर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, गुरढा येथील विद्यार्थ्यांसाठी नुकतेच एक महत्त्वपूर्ण कायदेशीर मार्गदर्शन शिबिर दिनांक २२ नोव्हेंबरला आयोजित करण्यात आले होते. या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पोक्सो कायदा, अमली पदार्थ आणि सायबर क्राईम यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष ऍड सुधाकर शिवनकर हे होते. त्यांनी विद्यार्थ्यांना पोक्सो (POCSO) कायद्याची माहिती देत, त्याचे महत्त्व व विद्यार्थ्यांवरील होणारे परिणाम समजावून सांगितले. यावेळी ऍड युवराज सलामे यांनी विद्यार्थ्यांना अमली पदार्थांचे दुष्परिणाम आणि त्यांच्यापासून दूर राहण्याचे महत्त्व यावर सखोल मार्गदर्शन केले. तसेच, आजच्या डिजिटल युगात अत्यंत कळीचा मुद्दा असलेल्या सायबर क्राईम या विषयावर ऍड. रवी भुसारी यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी सायबर गुन्हे कसे टाळावेत आणि ऑनलाइन सुरक्षितता कशी राखावी, याबद्दल टिप्स दिल्या. याप्रसंगी प्राचार्य योगराज मांडवटकर यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन प्रा. उमेश सिंगनजुडे यांनी केले, तर प्रास्ताविक प्रा. उमेश रेहपाडे यांनी सादर केले. उपस्थित मान्यवर आणि विद्यार्थ्यांचे आभार प्रा. चंद्रकिरण साखरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जवाहर मुंगुसमारे, सुभाष गरपडे, शोभा अंडेल, हिवराज केळझरे,योगिता टेकाम, आर्यन मोहतुरे, करण टांगले, कार्तिक नागलवाडे, प्रतीक घोनमोडे, नितेश मानकर, शिवम कांबळे, उत्कर्ष चेटूले, वेदांत फुलबांधे यांनी विशेष परिश्रम घेतले.

0 Response to "तालुका विधी सेवा समितीकडून विद्यार्थ्यांना कायदेशीर मार्गदर्शन."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article