"वंदे मातरम" भारतीयांना एका सूत्रात बांधणारा सर्वकालिक मंत्र- प्राचार्य डॉ.दिगंबर कापसे
शनिवार, 8 नवंबर 2025
Comment
"समर्थ महाविद्यालय लाखनी येथे वंदे
मातरम सार्ध शताब्दी महोत्सव"
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
लाखनी :- वंदे मातरम या अखंड प्रेरणादायी गीतरचनेला झालेली दीडशे वर्ष च्या निमित्ताने, "वंदे मातरम सार्थ शताब्दी महोत्सव" सर्व भारतात साजरा होत आहे. समर्थ महाविद्यालय लाखनी येथील सांस्कृतिक विभाग राष्ट्रीय सेवा योजना व छात्र सेना विभागामार्फत वंदे मातरम सामूहिक गायन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी प्राचार्य डॉ. दिगंबर कापसे सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. संगीता हाडगे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.बंडू चौधरी, छत्र सेनाप्रमुख कॅप्टन बाळकृष्ण रामटेके व वरिष्ठ प्राध्यापक डॉ. धनंजय गभणे व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी सामूहिक वंदे मातरम गीत गायनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी वंदे मातरम सामूहिक गीत गायनात सहभाग नोंदविला
वंदे मातरम या गीताने भारतीय स्वातंत्र्यलढ्यात न भूतो न भविष्यती असे योगदान दिले मवाळ जहाल व क्रांतिकारी. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्या सर्वांनाच वंदे मातरम गीताने सदैव प्रेरणा दिली असंख्य क्रांतिकारक वंदे मातरम चा घोष करून फासावर चढली यामुळे वंदे मातरम हा स्वातंत्र्य मंत्र ठरला वंदे मातरम गीत आणि भारतीयांना स्वातंत्र्यलढ्यात योगदान देण्याची प्रेरणा मिळाली यामुळेच ब्रिटिशांनी स्वातंत्र्यपूर्व काळात वंदे मातरम गीतावर बंदी आणली ब्रिटिशांच्या या निर्णयाने वंदे मातरम हे गीत स्वातंत्र लढ्यातील प्रभावी साधन बनले वंदे मातरमच्या निनादामुळेच भारतीयांना स्वातंत्र्य प्राप्त झाले. आता भारत विकसित भारत म्हणून जगापुढे सिद्ध व्हायचा असेल तर वंदे मातरम मागील जन्मभूमीची सेवा या भावाला अनुसरून सर्व भारतीयांनी योगदान दिले पाहिजे विकसित भारत घडवण्यासाठी सर्व भारतीयांनी तन-मन-धनाने योगदान दिले पाहिजे म्हणजे लवकरच विकसित भारताचे स्वप्न सत्यात उतरेल व तो वंदे मातरम गीताला खऱ्या अर्थाने सन्मान दिल्यासारखे होईल असे प्रतिपादन आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ दिगंबर कापसे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन रासेयोअधिकारी डॉ बंडू चौधरी तर आभार प्रदर्शन डॉ संगीता हाडगे यांनी मांनले.
0 Response to ""वंदे मातरम" भारतीयांना एका सूत्रात बांधणारा सर्वकालिक मंत्र- प्राचार्य डॉ.दिगंबर कापसे"
एक टिप्पणी भेजें