पालांदूर- खराशी-दिघोरी राज्यमार्गावर खराशी दरम्यान पडले जागोजागी खड्डेच खड्डे
शनिवार, 8 नवंबर 2025
Comment
वृत्त प्रतिनिधी
• अपघात होण्याची शक्यता, वाहन चालकांसह नागरिक त्रस्त
• स्थानिक लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष
पालांदूर :- येथून दिघोरीकडे खराशीमार्गे जाणाऱ्या राज्यमार्गावर जागोजागी खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना वाहन चालविणे कठीण झाले आहे.या रस्त्यावरील ऐन वळणमार्गावर असलेल्या खड्यामुळे एखाद्या वेळेस अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ता हे कळत नाही.या रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी तातडीने करावी,अशी मागणी केली जात आहे.
पलांदूर-दिघोरी या राज्यमार्गावरुन प्रवास करताना पालांदूर पार केल्यानंतर खराशी दरम्यान रस्त्यावरील प्रत्येक वळणमार्गावर खड्डेच खड्डे दिसून येतात.रस्त्याच्या खस्ता हालतीमुळे वाहन चालविताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते.या मार्गावर जड वाहतूक मोठ्या प्रमाणात असून रस्त्याच्या दुर्दशेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.रस्त्यावरील दिवसागणिक वाढणाऱ्या खड्ड्यांमुळे कधी अपघात होईल हे सांगणे कठीण आहे.
रस्त्याच्या अशा दुर्दशेकडे
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष कारणीभूत असल्याचा आरोप नागरिक करीत आहे.
दिघोरी - पालांदूर - अड्याळ हा राज्यमार्ग भंडारा,गोंदिया व गडचिरोली या तिन्ही जिल्ह्याचा संपर्क होणारा आहे.त्यामुळे वाहनधारकांची या मार्गाने अधिकच रेलचेल असते.या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे वाहन चालकांसह नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.मात्र याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत.जर मोठा अपघात झाला तरच प्रशासनाला जाग येईल का?असा प्रश्न वाहन चालकासह नागरिकांनी केला आहे.याकडे लवकरात लवकर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देवून यामार्गावर पडलेले खड्डे बुजविण्यात यावे.तसेच अपघात घडण्यापूर्वी लक्ष देण्याची गरज आहे.परंतु खड्ड्यांच्या त्रासामुळे वाहनधारक अधिकच संताप व्यक्त करीत आहेत.सदर मार्गावरील रस्त्याची तातडीने डागडूजी करावी.अशी मागणी जोर धरत आहे.
चौखट डब्बा
या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी
पालांदूर-दिघोरी राज्य मार्गावरुन प्रवास करताना खराशी गावाअगोदर असंख्य ठिकाणी पडलेल्या खड्यामुळे वाहन चालकांसह सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.रात्रीच्या वेळी वाहन चालकांना या रस्त्यावर पडलेले खड्डे दिसून येत नसल्यामुळे वाहनाचे चाक त्या खड्यात जाऊन अनेक वाहन चालकांचे अपघात घडले आहेत व दिवसागणिक घडतच आहेत. काही दुचाकी चालक या खड्यामध्ये पडल्याने त्यांचा अपघात झाला.काही दुचाकी वाहन चालकांना गंभीर तर काही वाहन चालकांना किरकोळ मार लागून जखमी झाले आहेत.मात्र याची तक्रार कोणाकडे करावी?असा प्रश्न संबंधितांना पडतो.दररोज लहान मोठे अपघात या मार्गावर होणे नित्याचेच झाले आहे.मात्र संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी लक्ष देत नसल्यामुळे हे खड्डे कोणी बुजवावे?असा प्रश्न उपस्थित होत आहे.या समस्याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देवून या मार्गावरील खड्डे अतीतात्काळ बुजविण्यात यावे,अशी मागणी वाहन चालकांसह नागरिकांनी केली आहे.
0 Response to "पालांदूर- खराशी-दिघोरी राज्यमार्गावर खराशी दरम्यान पडले जागोजागी खड्डेच खड्डे"
एक टिप्पणी भेजें