-->
आकर पाखर धान खरेदी केली जाणार नाही - अध्यक्ष विजय कापसे पालांदूर.

आकर पाखर धान खरेदी केली जाणार नाही - अध्यक्ष विजय कापसे पालांदूर.

• सेवा सहकारी संस्था पालांदूर धान खरेदी केंद्राचा उद्घाटन सोहळा 

"साप्ताहिक जनता की आवाज"
 न्यूज नेटवर्क 

पालांदुर :- शासकीय नियमानुसार एफएक्यू धानाची मोजणी करण्यात येईल. शेतकऱ्यांनी आकार पाकर धान मोजणी करिता केंद्रावर आणू नये. हेक्टरी ४० क्विंटलची मर्यादा पणन कार्यालयाने दिली आहे. ग्रेडरकडून मोजणीचे संदेश मिळाल्याशिवाय खरेदी केंद्रावर गर्दी करू नये. आदी नियमावलीचा संदेश संस्थेचे अध्यक्ष विजय कापसे सेवा सहकारी संस्था पालांदूर यांनी धान खरेदी केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. 

उद्घाटन प्रसंगी, संस्थेचे अध्यक्ष विजय कापसे, उपाध्यक्ष शरद खंडाईत, संचालक कोटीराम भुसारी, रामभाऊ थेर, ईश्वर तलमले, पुंडलिक खंडाईत, सचिव सुनील कापसे, ग्रेडर बालू खंडाईत, योगेश खंडाईत, प्रदीप खंडाईत, चपराशी देवराम तलमले, शाखा निरीक्षक रविकिरण खराटे बीडीसीसी पालांदूर, शेतकरी अरविंद हटवार, प्रमोद राऊत व प्रमोद हटवार उपस्थित होते.

सेवा सहकारी संस्था पालांदूर अंतर्गत संस्थेच्या गोडाऊनमध्ये धान खरेदी केंद्राचा श्रीगणेशा सोमवारला पार पडला. यावेळी सचिव सुनील कापसे यांनी सुद्धा खरेदीचे अनुसंगात शेतकऱ्यांना अपडेट केले. 

चौकट /डब्बा 
खरेदी केंद्रावर ओला धान आणू नये, खरेदी पूर्वी शेतकऱ्यांनी कार्यालयात नोंदणी करावी. नोंदणीला येताना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी. २३६९₹ प्रति क्विंटल दराने खरेदी करण्यात येईल. वेळोवेळी जिल्हा पणन कार्यालयाने पुरविलेल्या सूचनांचे बंधन शेतकरी बांधवांना पुरविले जातील.

फोटो: 

टिप: सदर संस्था आपली दिवाळी अंकाची जाहिरातदार आहे. कृपया फोटोसह बातमी घ्यावी.

0 Response to "आकर पाखर धान खरेदी केली जाणार नाही - अध्यक्ष विजय कापसे पालांदूर."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article