संविधानाला ७६ वर्षे पूर्ण झाली, पण आजही माणसाचा भरवसा न्यायालयापेक्षा गावच्या पुढाऱ्यांवर अधिक आहे.
बुधवार, 26 नवंबर 2025
Comment
संविधान दिनाच्या निमित्ताने...
२६ नोव्हेंबर : आज संविधान दिन आहे...
मी या विषयावर चर्चा करण्याइतपत मोठा नाही, पण मला त्या धुळीबद्दल बोलायचं आहे, जी आजही कोट्यवधी भारतीयांच्या कपाळावरून झटकली गेली नाही. भारताचे संविधान. ज्याला तयार व्हायला २ वर्षे, ११ महिने आणि १८ दिवसांचा कालावधी लागला, ते आज ७६ वर्षांचे झाले आहे. पण या देशातील ८० टक्क्यांहून अधिक जनतेला या 'संविधाना'विषयी काहीच माहीत नाही. 'हक्क' नेमका कशाला म्हणतात, हे त्यांना अजूनही कळलेलं नाही. ते फक्त जगतात, पण 'जगणं' कशाला म्हणतात हे न समजताच...
गावात एखाद्या पोलिसाची गाडी दूरून दिसली की माणूस आपलं शेत आणि हक्क दोन्ही सोडून भीतीने धावत पळतो. कारण त्याला कायदा माहीत नाही, त्याला फक्त 'भीती' माहीत आहे. कोणताही कागद नसताना, कोणताही गुन्हा नसतानाही, १५०-२०० रुपये हातात ठेवून तो समजून घेतो की, "चूक बहुधा माझीच असावी." आणि त्याची चूक फक्त एकच असते - त्याला संविधान (कायदा) माहीत नसते.
लोक गावच्या पुढार्याकडे (सरपंचाकडे) जातात आणि इंदिरा आवास घरकुल योजनेसाठी पाच हजार रुपये देऊन परत येतात. परत येताना त्यांना वाटतं की, "पुढार्याने आपल्यावर उपकार केला, आपले काम करून दिले." पण कोणीच त्यांना सांगत नाही की, ज्या घरासाठी त्यांनी पाच हजार रुपये दिले, त्यावर त्यांचा 'हक्क' आधीच लिहिलेला होता. उपकार केवळ अज्ञानावर होतो, हक्कावर नाही...
कोर्ट-कचेरी दूरूनच बरी शहाण्या माणसाने त्यांची पायरी चढू नये. लोक म्हणतात, "ती जागा फक्त पैसेवाल्यांची आहे, आमचं गरिबांचं (सामान्य माणसाचं) तिथे काय काम ?"
पण संविधानाच्या पुस्तकात स्पष्ट लिहिले आहे की, न्याय मिळवण्याचा हक्क सर्वात आधी सामान्य नागरिकाचाच आहे.
फक्त अडचण ही आहे की, ती संविधानाची पुस्तकं' अजून उघडलीच नाहीत.
संविधानात लिहिलेली प्रत्येक गोष्ट या देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनात रुजवावी लागेल. तेव्हाच लोक पोलिसांना बघून ताठ उभे राहतील. तेव्हाच ते गावातील पुढाऱ्यासमोर कॅमेरा काढून विचारतील - "साहेब, कशाचे पाच हजार रुपये मागत आहात ?"
तेव्हाच गावातला माणूस कोर्टात जाऊन ठामपणे सांगेल, "मला माझा हक्क पाहिजे."
आज संविधान दिन.. आपण जागे होऊन, प्रश्न विचारून आणि ज्ञान मिळवून साजरा करूया, जसा एखादा मोठा सण तयारी करून, कुटुंबाला एकत्र आणून आणि गर्वाने साजरा करतो तसा....
प्रत्येक सरकारने संविधानाला सोप्या भाषेत गावागावांपर्यंत पोहोचवायला हवे, प्रत्येक मार्गाने. पण हे काम सरकारं कधीच करणार नाहीत. कारण ज्या दिवशी प्रत्येक नागरिक संविधान समजेल,
त्या दिवशी सत्तेला सर्वात मोठी भीती वाटेल. आणि सत्ता प्रत्येक संकटातून वाचू शकते, पण जागृत नागरिकांसमोर सत्ता टिकाव धरू शकत नाही.
ज्या दिवशी जनतेला संविधानात लिहिलेल्या गोष्टी कळायला लागतील, त्याच वर्षीपासून संविधान दिवस या देशात दिवाळीप्रमाणे मोठ्या उत्साहाने साजरा होईल.
संकलन : नरेंद्र मेश्राम
संग्रहक : हर्षवर्धन देशभ्रतार
🙏🏻🙏🏻🙏🏻
0 Response to "संविधानाला ७६ वर्षे पूर्ण झाली, पण आजही माणसाचा भरवसा न्यायालयापेक्षा गावच्या पुढाऱ्यांवर अधिक आहे."
एक टिप्पणी भेजें