-->
धान कापणाऱ्या महिला मजुरांवर मधमाशांचा हल्ला !..

धान कापणाऱ्या महिला मजुरांवर मधमाशांचा हल्ला !..


• मरहेगाव येथील घटना, सरकारी व खासगीत उपचार 

पालांदूर :- नित्याप्रमाणे शेतात खाल मानेने धान कापणी करीत असताना अचानक मधमाशांनी हल्ला चढवीत महिला मजुरांना गंभीर जखमी केले. महिलानी घाबरलेल्या अवस्थेत आरडाओरडा केली. तेव्हा शेजारील शेतकरी धावून आले. सुदाम राऊत या शेतकऱ्याने गंभीर महिलांना वाकर/ चादर चा आधार देत प्रसंगाला सामोरे गेले. सर्व गंभीर महिला मजुरांना ग्रामीण रुग्णालय पालांदूर व खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. ही घटना सोमवारला सकाळी दहा वाजेच्या सुमारास रामाजी बेंद्वार यांच्या शेतात मरहेगाव तालुका लाखनी येथे घडली.

गोपिका नकटू शेंडे, उषा पुरुषोत्तम दृगकर, कविता राजेश राऊत, पिंकी महेश राऊत, कौशल्या काशीराम बेंद्वार, अस्मिता शिवशंकर मेश्राम, वंदना शिवराम मेश्राम, कुंदा लवेश बेंद्वार, ताराबाई सुधाकर सिंग, मंदा रामा बेंद्वार आदी महिला जखमी झाल्या. कौशल्या बेंद्वार व गोपिका शेंडे यांची प्रकृती अधिकच गंभीर आहे. त्यांच्यावर खाजगीत उपचार सुरू आहेत. 

मधमाश्याचा पोळा धान कापत असलेल्या बांधानात पळसाच्या झाडावर होता. त्याच्याकडे कुणाचेच लक्ष नव्हते. महिला भगिनींनी नित्याप्रमाणे आपले कापणीचे काम सुरू केले आणि थोड्याच वेळात मधमाशांनी एकच हल्ला चढविला. विशेष म्हणजे, शेजारील शेतकरी बांधव धावत येत महिलांना धीर देत थेट पालांदूर येथील दवाखान्यात भरती केले. 


0 Response to "धान कापणाऱ्या महिला मजुरांवर मधमाशांचा हल्ला !.."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article