-->
स्वच्छ सूर्यप्रकाश व कोरडे हवामानमुळे थंडीत वाढ!

स्वच्छ सूर्यप्रकाश व कोरडे हवामानमुळे थंडीत वाढ!


"साप्ताहिक जनता की आवाज" 
वृत्तपत्र प्रतिनिधी
 
 भंडारा :- स्वच्छ सूर्यप्रकाश व कोरडे हवामानामुळे थंडीत वाढ! पालांदूर (चौरस) स्वच्छ सूर्यप्रकाश व कोरड्या हवामानामुळे किमान तापमानात घट होत आहे. त्यामुळे दररोज थंडीत वाढ होताना जाणवत आहे. पुना किमान तापमान घटनार असून थंडीत वाढ होण्याची शक्यता वाढली आहे. ज्येष्ठांना व बच्चे कंपनींना याचा त्रास होणार आहे. त्याकरिता आरोग्याच्या टिप्स वापरून आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांची गती विदर्भाच्या दिशेने वाढल्याने थंडीत वाढ होत आहे. दुपारच्या वेळेला उन्हाचा चटका जाणवत असला तरी सावलीत गेल्यात पुन्हा थंडीच वाटते आहे. पहाटेला अधिकच थंडी वाजत आहे. सकाळी फिरणाऱ्यांची संख्या वाढली असून पहाटे उठणार यांची संख्या मात्र कमी होत आहे. पहाटेपासून सकाळपर्यंत दाट धूके पडत आहेत. आरोग्याला पोषक... थंड हवामान आरोग्याच्या दृष्टीने पोषक समजला जातो. थंड हवामान आरोग्याला सुदृढता पोहोचते. पुढचे तीन महिने थंडी कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. रुग्णालयात सुद्धा तीन महिने रुग्णांची संख्या ढेपाळलेली राहण्याची शक्यता आहे. कडधान्याला सुद्धा पोषकता... खरीप हंगाम संपून रब्बी हंगामाला सुरुवात झाली आहे. गहू हरभरा व इतरही कडधान्याला थंड हवामान पोषक असतो. पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे रब्बी हंगाम उशिराने लागवडीखाली येत आहे. भाजीपाल्याला सुद्धा थंड हवामान पोषक ठरत आहे. तापमानात घट... किमान तापमान १५अंशापर्यंत तर कमाल तापमान २९ अंशापर्यंत नियोजित आहे. पुढच्या महिन्यात यापेक्षा आणखी कमी तापमान राहण्याची शक्यता दाट आहे. डिसेंबर महिना हाडे गोठवणारा ठरेल असा अंदाज ग्रामीण भागात ज्येष्ठ माणसं बोलत आहेत. शेकोट्या पेटल्या... ग्रामीण भागात सकाळच्या वेळेला शेकोट्या पेटविणे सुरू झाले आहे. सकाळला फिरायला जाणारे गावाबाहेर शेकोट्या पेटवून थंडीपासून बचाव करण्याचा प्रयत्न करतात. कपाटात ठेवलेले लोकरचे कापडे वापरण्यास सुरुवात झाली आहे. दुकानात सुद्धा गर्मीच्या कपड्यांना मागणी वाढत आहे.

0 Response to "स्वच्छ सूर्यप्रकाश व कोरडे हवामानमुळे थंडीत वाढ! "

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article