-->
श्री संताजी कला व विज्ञान महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा.

श्री संताजी कला व विज्ञान महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा.


नरेंद्र मेश्राम 
"साप्ताहिक जनता की आवाज".

पालांदूर :- स्थानिक श्री संताजी कला व विज्ञान महाविद्यालयामध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय संविधानाचे महत्त्व आणि नागरिकांच्या कर्तव्यांविषयी याप्रसंगी सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून डॉ. रमेश बागडे यांनी भारतीय संविधान व आपले कर्तव्य या विषयावर प्रकाश टाकला. संविधानाचे मूलभूत तत्त्वज्ञान स्पष्ट करताना त्यांनी विद्यार्थ्यांना भारतीय नागरिकांची जबाबदारी समजावून सांगितली.या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. प्रमोद शेंडे यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की, संविधान हा भारतीय लोकशाहीचा आत्मा असून, संविधानामुळेच भारतीय लोकशाहीचा मजबूत पाया भक्कम झाला आहे.डॉ. संजयकुमार निंबेकर यांनी भारतीय संविधान निर्मिती प्रक्रिया ते संविधान दुरुस्त्या आणि आजच्या काळातील संविधानाचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी संविधानातील तरतुदी आणि त्यांचा सामाजिक जीवनावर होणारा परिणाम याबद्दल माहिती दिली.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. गिरीश लांजेवार यांनी भूषवले. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात नागरिकांचे अधिकार व कर्तव्य याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले आणि संविधानाचे पालन करणे हे प्रत्येक नागरिकांचे परम कर्तव्य असल्याचे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रमेश बागडे यांनी केले, तर कार्यक्रमाचे संचालन अहिंसक खोब्रागडे यांनी उत्कृष्टरित्या केले. डॉ. नितिन थूल यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमाला महाविद्यालयातील डॉ. राजेंद्र खंडाईत, डॉ. रवी पाठेकर, प्रा. मनोज मोहतुरे, डॉ. दीपक अंभोरे, प्रा. रोहिणी कोचे, प्रा. सेलोकर, प्रणय वलथरे, श्री महेश गुरखे, श्रीमती जया गोडापे,श्री जयदेव ढवळे, अनिकेत ठवरे, लक्ष्मी भानारकर, प्रियंका खेडीकर,  यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

0 Response to "श्री संताजी कला व विज्ञान महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article