-->
पालांदूर येथे शहिदांना आदरांजली व संविधान दिन उद्देशिकेची शपथ, अग्नीवीर जवानांचा सत्कार.

पालांदूर येथे शहिदांना आदरांजली व संविधान दिन उद्देशिकेची शपथ, अग्नीवीर जवानांचा सत्कार.

• दिवसभर भक्तीमय वातावरण स्थानिक पदाधिकाऱ्यांसह गावकऱ्यांची मोठी उपस्थिती.

नरेंद्र मेश्राम 
"साप्ताहिक जनता की आवाज".

पालांदूर :- देशाच्या संरक्षणार्थ स्वतःच्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर शहिदांसह २६/११ च्या मुंबई येथील भ्याड हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना पालांदूर येथे आदरांजली वाहण्यात आली. तसेच संविधानाचा वर्धापन दिन उद्देशिकेची शपथ देत घेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष करण्यात आला.  देशभक्तीमय  दिमाखदार सोहळा पार पडला. 

पालांदूर, कवलेवाडा व मेंगापूर यांच्या संयुक्त विद्यमाने १७ वर्षाची अखंड परंपरा कायम ठेवत बुधवारला शहीद श्रद्धांजली कार्यक्रम बाजारचौक पालांदूर येथे सायंकाळी ५ वाजे सर्व स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या व गावकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला. 

ठाणेदार सतीश बनसोड यांच्या हस्ते वीर जवानांच्या प्रतिमांना पुष्पचक्र वाहण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करीत अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तु.रा .भुसारी गुरुजी, ज्येष्ठ नेते दामाजी खंडाईत, कार्यक्रमाचे मार्गदर्शक माजी जि प सदस्य भरत खंडाईत, जि प सदस्य सरिता कापसे, प  स सदस्य योगेश्वरी झलके, सरपंच लता कापसे, सरपंच मनीषा खंडाईत, सरपंच श्यामराव बेंद्वार, सरपंच योगेश झलके, सरपंच नरेश फुंडे, उपसरपंच पंकज रामटेके, माजी सरपंच वैशाली खंडाईत, माजी उपसभापती विजय कापसे, माजी उपसरपंच स्वप्निल खंडाईत, पंकज घाटबांधे, केवळराम कापसे गुरुजी, प्रा. आनंदराव मदनकर, मुरलीधर कापसे, उद्योगपती इद्रिस लद्धांनी, सेवानिवृत्त शिक्षक कृष्णाजी जांभुळकर, दोन्ही गावचे ग्रामपंचायत सदस्य, मान्यवर मंडळी व सेवानिवृत्त पोलीस , सैनिक उपस्थित होते. 
कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर आशिष गभणे यांनी उपस्थितांना संविधानाच्या उद्देशिकेची शपथ दिली. 

अग्निवीर सैनिकांचा सन्मान...
नवनियुक्त अग्नीवीर सैनिक अक्षय उपरीकर वाकल, मयूर नंदरधने वाकल, टीकेस बागडकर पालांदूर यांचा शालश्रीफळ देत सन्मान करण्यात आला. तर वर्षभर साईबाबा मंदिर व परिसर निस्वार्थ सेवेने स्वच्छतेचे व्रत स्वीकारलेल्या प्रमिला मंगेश हटवार यांचा सुद्धा साडी चोळी व बांगड्या देत गौरविण्यात आले. 
कार्यक्रमाचे मार्गदर्शक भरत खंडाईत यांनी जिवंत असेपर्यंत शहीद श्रद्धांजली कार्यक्रमाची अखंड परंपरा सांभाळण्याची ग्वाही दिली. गत १७ वर्षापासून शहिद श्रद्धांजली कार्यक्रम पालांदूर येथे सुरू आहे. मान्यवरांनी मार्गदर्शनात अख्या जिल्ह्यात पालांदुरात होत असलेला हा कार्यक्रम निश्चितच गावच्या एकतेचा , अखंडतेचा व विश्वासाचा प्रेरणादायी ठेवा असल्याचे बोलले. प्रस्तावना भरत खंडाईत संचालन डॉक्टर आशिष गभने तर आभार श्यामराव बेंदवार यांनी केले. भारत माता की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय असा जयघोष करीत कार्यक्रमाची सांगता झाली.


0 Response to "पालांदूर येथे शहिदांना आदरांजली व संविधान दिन उद्देशिकेची शपथ, अग्नीवीर जवानांचा सत्कार."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article