तुमसर नगरपरिषद अध्यक्ष पदासाठी अधिक चुरशी रंगत व बंडखोरी.
सोमवार, 17 नवंबर 2025
Comment
• .भाजपाचे उमेदवार प्रदीप पडोळे राकापचे उमेदवार अभिषेक कार्यमोरे काँग्रेसचे उमेदवार अनिल बावनकर शिवसेना शिंदे गटची कल्याणी भुरे यांना उमेदवारी निश्चित
• .माननीय आमदार राजू कारेमोरे यांचे खाजगी सहकारी यासीन छवारे सागर गभने व भाजप शिवसेना चे जेष्ठ कार्यकर्ता आशिष कुकडे यांचे बंडखोरी.
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी.
तुमसर :- स्थानिक प्रतिनिधी जनचरचे द्वारा मिळालेल्या माहितीनुसार वृत्त असे आहे की तुमसर नगरपरिषद अध्यक्षपदासाठी चांगलीच चुरशी रंगली असून भाजपाचे प्रदीप पडोळे यांनी पहिल्यांदा पत्र परिषद घेऊन सर्व पदाचा राजीनामा दिले असे कळले परंतु कालांतराने त्यांना उमेदवारी मिळाल्याने भाजपा कार्यकर्त्यात व विरोधकात चांगलीच गदारोड झाली तर राका अपगचे संभावित उमेदवार अभिषेक कारेमोरे आमदार राजेभाऊ कारेमोरे यांचे खाजगी सहकारी यासीन छवारे सागर गाभणे व वरिष्ठ कार्यकर्ता योगेश शिगंजुडे यांच्या नावाची चर्चा जोमाने सुरू होती. परंतु गोंदिया येथील प्रफुल पटेल भंडारा डिस्टिक को-ऑपरेटिव बँकेचे संचालक सुनील पुंडे आमदार राजू कारेमोरे यांच्या चांगलीच चर्चा रंगली असे दिसते व कार्यकर्त्यात उडतान झाली असताना हाय कमांड व जेष्ठ च्या अनुषंगाने अभिषेक कार्यमोरे यांना उमेदवारी देण्यात आली त्यामुळे खाजगी कार्यकर्त्यात बंडखोरी चे चित्र दिसू लागले तसेच काँग्रेसच्या अनिल बावनकर यांनी आपली माघारी घेत पत्र परिषद काढले होते परंतु काँग्रेसच्या तुगलक नीतीमुळे नव्या चेहऱ्यांना डावलत नाना पटोले च्या आग्रहास्तव अनिल बावनकर यांना काँग्रेसची उमेदवारी देण्यात आली तर शिवसेना शिंदे गटातील महिला म्हणून कल्याणी भुरे यांना उमेदवारी जाहीर झाले असून इकडील जेष्ठ कार्यकर्ता भाजपा व शिवसेना चे आशिष कुकडे यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे यांनी सुद्धा बंड पुकारला आहे तर यासीन छवारे यांनी सागर गाभणेला पाठिंबा देत आज अर्ज दाखल करण्यासाठी महा रेलीचे आयोजन केले आहे त्यामुळे नागरिकात चांगले संभ्रम झाले असून रणनीतीच्या आक्रमक पवित्रा रंगल्यामुळे महासंग्राम होण्याची नगरपरिषद निवडणुकीत चांगलीच चुरशी मानले जात आहे असे जण चर्चेचा विषय आहे.
0 Response to "तुमसर नगरपरिषद अध्यक्ष पदासाठी अधिक चुरशी रंगत व बंडखोरी."
एक टिप्पणी भेजें