-->
पालांदूर येथील आरोग्य शिबिरात १०३ रुग्णांची तपासणी व औषध उपचार.

पालांदूर येथील आरोग्य शिबिरात १०३ रुग्णांची तपासणी व औषध उपचार.


"साप्ताहिक जनता की आवाज" 
 वृत्त प्रतिनिधी 

पालांदूर :- संविधान  दिनाच्या  अनुषंगाने ग्रामपंचायत कवलेवाडा येथे आरोग्य शिबिर पार पडले. भरत खंडाईत व मित्रपरिवार यांच्या सौजन्याने आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होता. यात दुपारपर्यंत १०३ रुग्णांनी तपासणी करून औषधे चे वाटप करण्यात आले. रुग्णांची संख्या सायंकाळपर्यंत वाढतच होती. याकरिता यादराव पडोळे मेमोरियल हॉस्पिटल भंडारा यांची नर्सिंग व औषधी वाटप जमु सहर्ष हजर होती.

शेवटच्या टोकातील गोरगरीब जनतेला अत्याधुनिक उपचार मिळावे व औषध उपचार मोफत व्हावा या सामाजिक भूमिकेतून ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर आशिष  गभणे  यांनी डॉक्टर प्रांजली प्रशांत पडोळे, डॉक्टर आशिष आकरे, डॉक्टर निहाल बुराडे, नेत्ररोग तज्ञ डॉक्टर रितेश चौरागडे, अस्थिरोग तज्ञ डॉक्टर आदित्य रोकडे आदींच्या सहकार्याने रुग्णांची सहर्ष सेवा करीत माणुसकीचा  परिचय दिला.


0 Response to "पालांदूर येथील आरोग्य शिबिरात १०३ रुग्णांची तपासणी व औषध उपचार."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article