तुमसरमधील भाविकांचा मध्यप्रदेशात अपघात.
रविवार, 9 नवंबर 2025
Comment
विकास चंद्रिकापुरे व यासीन छवारे हे गंभीर जखमी.
"साप्ताहिक जनता की आवाज"
वुत्त प्रतिनिधी
तुमसर :- येथील काही भाविकं अजमेर व उज्जैनला देवदर्शनाकरीता जात होते. यावेळी मध्यप्रदेशातील पांढुर्णा येथे कार क्र. एमएच ४० सीक्यू ९२११ ला ट्रक ने जोरदार धडक दिली. यात कारमधील ६ भाविक जखमी झाले तर कारचालक हा कारच्या सीटमध्ये अडकला. त्याला गॅसकटरच्या मदतीने सीट कापून बाहेर काढण्यात आले. सदर घटना
शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला.
सदर घटनेत पुष्पेंद्र राजेंद्र सिंह, शेखर पारधी, अविनाश पटले, रवि रहांगडाले, विकास चंद्रिकापुरे आणि यासीन छवारे हे गंभीर जखमी झाले. जखमींना प्राथमिक उपचारानंतर नागपूर येथे रेफर करण्यात आले. वृत्त लिहीपर्यंत अधिकची माहिती हाती आली नाही.
0 Response to "तुमसरमधील भाविकांचा मध्यप्रदेशात अपघात."
एक टिप्पणी भेजें